बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘तेजस’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. आता थिएटरनंतर ओटीटीवर या चित्रपटाला काय प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी बरेच लोक उत्सुक आहेत. नुकतंच चित्रपटांच्या निर्मात्यांनी ‘तेजस’ची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. प्रेक्षकांना घरात बसून ‘तेजस’चा आस्वाद केव्हा आणि कसा घेता येईल तेच आपण जाणून घेऊया.

‘तेजस’ बाबत, निर्मात्यांनी घोषणा केली आहे की तो ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सर्वेश मेवाडा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. तर, याचे निर्माते रॉनी स्क्रूवाला आहेत. या चित्रपटात कंगना भारतीय वायुसेनेच्या पायलटची म्हणजेच तेजस गिलची भूमिका साकारत आहे. बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.

navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
money laundering in immigration
ED On Canada Colleges : कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल

‘धाकड’, ‘चंद्रमुखी २’पाठोपाठ ‘तेजस’सुद्धा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटल्याने सोशल मीडियावर कंगनाला प्रचंड ट्रोल केलं गेलं. सुरुवातीला या चित्रपटाला ठीकठाक प्रतिसाद मिळाला होता परंतु नंतर हा चित्रपट बऱ्याच चित्रपटगृहात उतरवणं थिएटर मालकांना भाग पडलं. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या चित्रपटाला पाठींबा देण्याचेही आव्हान जनतेला केले परंतु प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पूर्णपणे पाठ फिरवली.

आणखी वाचा : “मला ‘द आर्चीज’ पाहायची अजिबात इच्छा नव्हती पण…” मनोज बाजपेयी यांनी केला मोठा खुलासा

‘तेजस’मध्ये कंगना रणौतबरोबर आशिष विद्यार्थी, हर्षवर्धन राणे, दिव्या दत्ता, अंशुल चौहान आणि वरुण मित्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता ‘तेजस’ ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ५ जानेवारी २०२४ पासून पाहायला मिळणार आहे. कंगना राणौतच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच ‘इमर्जन्सी’मध्ये पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तिचा आर माधवनसह एक चित्रपटही येणार आहे, ज्याचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही.

कंगनाचा ‘तेजस’ यावर्षी २७ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मात्र देशातील बहुतांश प्रेक्षकांनी हा चित्रपट नाकारला. त्याची कामगिरी इतकी वाईट होती की त्याला मेगाफ्लॉपचा किताब मिळाला आहे. ‘विकिपीडिया’च्या माहितीनुसार, ‘तेजस’चे बजेट ७० कोटी रुपये होते पण भारतात त्याचे कलेक्शन निव्वळ ६.२ कोटी रुपये असल्याचे समोर आहे आहे. आता हा चित्रपट ओटीटीव नेमकी कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Story img Loader