विनोदासाठी ओळखला जाणारा कपिल शर्मा(Kapil Sharma) हा सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये दिसत आहे. जगभरात त्याचे चाहते असल्याचे दिसते. सोशल मीडियावरदेखील त्याच्या फॉलोअर्सची संख्या जास्त असल्याचे दिसते. अनेकदा तो त्याच्या लाइफस्टाईलमुळेदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतो. आता कपिल शर्माच्या घराती किंमत तसेच त्याची संपत्ती किती हे आपण जाणून घेऊयात.

कपिल शर्माच्या मुंबईतील घराची किंमत किती?

मॅजिकब्रिक्सने दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा मुंबईतील अंधेरी पश्चिम या ठिकाणी राहतो. या ठिकाणी अनेक बॉलीवूड सेलेब्रिटींची घरे आहेत. ज्यामध्ये आलिया भट्ट, नवाजुद्दीव सिद्धकी, मिका सिंह, सोनू सूद यांचा समावेश आहे. कपिल शर्माचे मुंबईतील हे घर १५ कोटी रूपयांचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिलचे पंजाबमध्ये एक फार्महाऊस आहे, ज्याची किंमत अंदाजे २५ कोटी इतकी आहे. याबरोबरच, कपिल शर्माची स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन आहे. जी खूप प्रशस्त आहे. संपूर्ण सुख सुविधा असलेली ही व्हॅनिटी व्हॅन ५.५ कोटी रूपयांची आहे. दिलीप छाबड़ियायांनी ही व्हॅनिटी व्हॅन डिझाइन केली आहे. विशेष बाब म्हणजे या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक प्रशस्त लॉबी आहे, तसेच एलईडी लायटिंगदेखील आहे.

याबरोबरच, अनेकदा कपिल शर्मा महागड्या वस्तू खरेदी करताना दिसतो. त्याचे कपडे डिझाइनर असतात. एका कार्यक्रमात त्याच्याबरोबर एक बॅग दिसली होती. त्याची किंमत एक लाख इतकी होती. कपिल शर्मा सोशल मीडियावर त्याने विकत घेतलेल्या अनेक वस्तूंची झलक शेअर करत असतो. कपिल शर्माकडे महागड्या गाड्या असल्याचेदेखील पाहायला मिळते. त्याच्याकडे मर्सिडीज़ बेंज एस ३५०, रोवर रेंज रोवर इवोक, वोल्वो एक्ससी ९० एसयूवीव्ही, तसेच त्याची स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन आहे.

कपिल शर्माच्या संपत्तीबाबत बोलायचे तर फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार, कपिल शर्माची एकूण संपत्ती सुमारे २८० कोटी असण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत, त्याच्या संपत्तीत ३८०% ने वाढ झाली आहे. यामध्ये ब्रँड जाहिरातींचा वाटा आहे. ज्यासाठी तो प्रति ब्रँड १ कोटी आकारतो असे म्हटले जाते. कपिलचे महिन्याचे उत्पन्न सुमारे ३ कोटी असण्याचा अंदाज आहे, तर त्याची वार्षिक कमाई अंदाजे ३५ कोटी असण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, कपिल शर्मा त्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.

Story img Loader