बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या हटके फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. याबरोबरच तो त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय टॉक शोसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. करणच्या या टॉक शोवर वेगवेगळे बॉलिवूड सेलिब्रिटीज हजेरी लावतात आणि धमाल गप्पा आणि गॉसिप करतात. त्याचा हा शो प्रथम टेलिव्हिजनवरही यायचा, पण गेल्याच वर्षी आलेल्या सीझनपासून करणने हा शो फक्त ओटीटीवर येणार असल्याचं जाहीर केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतर सीझनप्रमाणेच ‘कॉफी विथ करण सीझन ७’सुद्धा गॉसिप्सनी भरलेला होता. विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, समांथा रूथ प्रभू, अक्षय कुमार, कतरिना कैफ, अशा कित्येक सेलिब्रिटीजनी या सीझनमध्ये हजेरी लावली. आता ‘कॉफी विथ करण’च्या पुढच्या सीझनची जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार लवकरच ‘कॉफी विथ करण’चा सीझन ८ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : ‘बेशरम रंग’नंतर शाहरुख-दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा लावणार वेड; ‘जवान’च्या सेटवरील फोटो व्हायरल

एका न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, ‘कॉफी विथ करण सीझन ८’च्या सुरुवातीच्या एपिसोडसाठी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला बोलावण्याचा विचार करण जोहर करत आहे. बॉलीवूडच्या या आदर्श जोडप्याने या शोमध्ये त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलावे अशी करणची इच्छा आहे. करण जोहर या नव्या सीझनमध्ये करीना कपूर खान, अक्षय कुमार, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि काही बड्या स्टार्सनाही बोलवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’चं कलेक्शन १००० कोटींहून अधिक; YRF आणि शाहरुख खान यांच्या हाती लागले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या

‘कॉफी विथ करण’चा हा नवा सीझन जूनच्या अखेरीस ऑनलाइन उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबरोबरच ‘पठाण’च्या माध्यमातून इतिहास रचणारा किंग खान शाहरुख खानही या सीझनमध्ये दिसणार आहे. करण जोहर सात वर्षांनी दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करणार आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar koffee with karan season 8 update alia bhatt and ranbir kapoor will be the guest avn