बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन सुरू आहे. हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत. बऱ्याच सेलिब्रिटीजनी या नव्या सीझनमध्ये हजेरी लावली आहे. रणवीर सिंह, दीपिका पदूकोण, सनी देओल, बॉबी देओलपासून वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत कित्येकांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. नुकतेच या शोच्या नवीन एपिसोडचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या नव्या एपिसोडमध्ये राणी मुखर्जी व काजोल या दोघींनी हजेरी लावली. ‘कुछ कुछ होता है’नंतर प्रथमच या दोघींना एकत्र पाहून बरेच प्रेक्षक खुश झाले. या नव्या एपिसोडमध्ये दोघींनी अगदी मानमोकळेपणे गप्पा मारल्या. याच मुलाखतीदरम्यान करणने राणी मुखर्जी व आदित्य चोप्रा यांच्या सीक्रेट लग्नाबद्दलही खुलासा केला. २०१४ मध्ये राणी व आदित्य लग्नबंधनात अडकले, परंतु त्यांचा विवाहसोहळा इतका सीक्रेट होता की त्यामध्ये हातावर मोजता येतील इतकीच मंडळी हजर असल्याचा खुलासा करणने केला.

आणखी वाचा : “आम्ही प्रेक्षकांचे पैसे…” ‘अंतिम’ व ‘किसी का भाई किसी की जान’च्या अपयशाबद्दल सलमान खान प्रथमच बोलला

करण म्हणाला, “आदित्य हा माझा या जगातील सर्वात चांगला मित्र आहे, आम्ही बऱ्याचदा त्याच्या आणि राणीच्या लग्नाबद्दल चर्चा केली आहे. ते एक डेस्टीनेशन वेडिंग होते. त्यांचं लग्नं कुठे झालं हे मी आजही कुणालाच सांगू शकत नाही, कारण इतक्या वर्षांनीही आदित्य मला खूप ओरडेल. आम्ही दिवाळीला काढलेले फोटोजसुद्धा तो मला शेअर करू देत नाही. त्याने जेव्हा मला त्याच्या लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा त्याने मला सक्त ताकीद दिली होतो. तो म्हणाला लग्नात फक्त १८ लोकांनाच निमंत्रण आहे अन् त्यापैकी याबद्दल बाहेर बोलबाला करणारा फक्त तूच आहेस, त्यामुळे या लग्नाची बातमी जर बाहेर आली तर ती तुझ्याकडूनच येऊ शकते. त्यावेळी वृत्तपत्रांचा चांगलाच खप होता.”

पुढे करण म्हणाला, “या लग्नासाठी मला माझ्या आईशी खोटं बोलावं लागलं. एप्रिल २०१४ मध्ये आमचा ‘२ स्टेट्स’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मला त्यावेळी चित्रपटाच्या रिलीजलाही जाता आलं नाही. माझा मॅनचेस्टरमध्ये एक कार्यक्रम आहे असं खोटं सांगून मला लग्नाला यावं लागलं. या गोष्टी मी अजिबात विसरणार नाही.” २०१४ मध्ये आदित्य आणि राणी लग्नबंधनात अडकले अन् पुढच्याच वर्षी त्यांच्या पोटी अदिरा नावाच्या गोड मुलीचा जन्म झाला.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar says there were only 18 peoples at aditya chopra and rani mukerji secret wedding avn