‘ब्लॅक वॉरंट’ या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. नेटफ्लिक्सवरील या सीरिजला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता जहान कपूर मुख्य भूमिकेत आहे. जहानला IMDbचा ‘ब्रेकआउट स्टार स्टारमीटर’ पुरस्कार मिळाला आहे. दर महिन्याला जगभरातून IMDb वर येणाऱ्या २५ कोटींहून अधिक व्हिजिटर्सच्या पेज व्ह्यूजनुसार त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपट, टीव्ही शोज व सेलिब्रिटीजवरील माहितीचा सर्वात प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb चा “ब्रेकआउट स्टार” स्टारमीटर पुरस्कार हा ब्लॅक वॉरंट मधील अभिनेता जहान कपूरला देण्यात येत आहे. IMDb अॅपवर प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या परफॉर्मरला हा पुरस्कार दिला जातो. जगभरातून दर महिन्याला येणाऱ्या २५ कोटींहून अधिक असलेल्या व्हिजिटर्सच्या पेज व्ह्यूजद्वारे ही यादी तयार केली जाते.

हेही वाचा – ८ वर्षांचा संसार मोडल्यावर पुन्हा प्रेमात पडल्याची अभिनेत्याने दिली कबुली; म्हणाला, ७ वर्षांच्या लेकीच्या संपर्कात नाही

कपूरने विक्रमादित्य मोटवानीच्या तिहार तुरुंगावर बेतलेल्या ब्लॅक वॉरंटमध्ये दमदार भूमिका करून जहानने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने तिहार जेलमधील अधिकारी सुनील कुमार गुप्ता ही भूमिका साकारली आहे. थरारक मांडणी व लक्षवेधी अभिनयामुळे गाजलेल्या या मालिकेला जगभरातील चाहत्यांचं प्रेम मिळतंय. या सीरिजला IMDb वर १० पैकी ८ रेटिंग मिळाले आहे. या शोच्या यशानंतर प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये जहान कपूर तीन वेळा टॉप १० मध्ये होता. दोन आठवड्यांपूर्वी तो या यादीत पहिल्या स्थानावर होता.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न

अभिनेता जहान कपूर (फोटो – पीआर)

आनंद व्यक्त करत जहान कपूर म्हणाला, “IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याचा मला अतिशय आनंद होतो. हा पुरस्कार चाहत्यांनी मला दिला आहे. हा फार स्पेशल आहे, कारण तो तुम्हा सर्वांमुळे मिळाला आहे. आम्ही जे काम केले, ते लोकांना रिलेट झाले व प्रत्येकाला माझ्याबद्दल अधिक माहिती घ्यायची होती. यामुळे माझा उत्साह खूप वाढला आहे.”

हेही वाचा – जया बच्चन यांची सून आहे ‘ही’ अभिनेत्री, २ वर्षे तुरुंगात कैद्यांबरोबर राहिली, आता आहे OTT क्वीन

जहान कपूर हा शशी कपूर यांचा नातू आहे. तो कुणाल कपूरचा मुलगा आहे. जहानचे आजोबा शशी कपूर व रणबीरचे आजोबा राज कपूर हे सख्खे भाऊ होते. जहानने २०२२ मध्ये फराजमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्याला ‘ब्लॅक वॉरंट’मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सीरिजचं यश साजरं करण्यासाठी जहानची चुलत भावंड रणबीर कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर एकत्र आले होते.