कॉफी विथ करणचा आठवा सीझन सुरू आहे. करण जोहरच्या या चॅट शोचा नवा एपिसोड दर गुरुवारी प्रसारित होतो. आतापर्यंत याचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. आठव्या सीझनची सुरुवात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने यांनी हजेरी लावून केली. दुसऱ्या एपिसोडमधील सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघे बंधु पाहुणे म्हणून आले तर तिसऱ्या भागात सारा अली खान व अनन्या पांडे या स्टारकिड्सनी हजेरी लावली. आता याच्या पुढील भागाबद्दल लोकांना उत्सुकता लागलेली असतानाच याच्या पुढील भागाचा प्रोमो समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रोमोमध्ये करीना कपूर व आलिया भट्ट या दोघींनी एकत्र हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूडची नणंद आणि वहीनीची ही जोडी या चॅट शोच्या आगामी भागात प्रचंड धमाल करताना पाहायला मिळणार आहे. या प्रोमोमध्ये करण जोहर आलिया आणि करीना या दोघींची चांगलीच खिल्ली उडवताना दिसत आहे.

आणखी वाचा : ‘शोले’नंतर अमजद खान यांनी सलीम-जावेद या जोडीबरोबर कधीच काम केलं नाही; ‘हे’ होतं खरं कारण

या प्रोमोमध्ये करणने करीनाला तिच्या आणि आलियामधील नात्याबद्दल प्रश्न विचारला, करण विचारतो, की “तू आणि नेमकी आलियाची कोण लागते वहिनी की भावजय?” यावर करीना उत्तरली की, “मी कोणाचीही वाहिनी नाही.” करीनाच्या या उत्तरावर अन् करण ने तिला विचारलेल्या या खोचक प्रश्नावर आलियाल हसू आवरलं नाही व ती जोरात हसली.

याबरोबरच या प्रोमोमध्ये करणने करीनाला अमीषा पटेलबद्दल पण विचारलं, त्या दोघींमध्ये काही वाद होते अशी चर्चा असल्याचं करणने विचारलं, यावर करीना म्हणाली, “करण मी तुझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे.” अशी बरीच मजा मस्करी या नव्या भागात पाहायला मिळणार आहे. राकेश रोशन यांच्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटात प्रथम करीनाला मुख्य भूमिकेत घेण्यात आलं होतं. काही सीन्स करीनाने शूटही केले होते, परंतु नंतर तिने यातून काढता पाय घेतला व ही भूमिका अमीषाकडे आली.

मध्यंतरी ‘बॉलिवुड बबल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमीषाने सांगितलं की शूट सुरू होण्याआधीच राकेश रोशन यांनी करीनाला चित्रपट सोडण्यास सांगितलं होतं. यामुळे या दोघींमध्ये काहीतरी वाद आहे असं चित्र समोर आलं होतं, आता हाच वाद करणने त्याच्या चॅट शोमध्ये पुन्हा उकरून काढल्याने करीनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. ‘कॉफी विथ करण ८’चा हा आगामी भाग गुरुवारी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor ignores question about ameesha patel on koffee with karan 8 avn