बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा नवा चित्रपट ‘जाने जान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ट्रेलर ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात करीना कपूरबरोबर ‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावत आणि ‘दहाड’ फेम विजय वर्मादेखील मुख्य भूमिकेत आहेत. ‘जाने जान’चे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे.

हा चित्रपट ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या जपानी रहस्य कादंबरीवर आधारित आहे. ट्रेलरची सुरुवात करीना कपूरपासून होते. ज्यामध्ये ती माया डिसूझाच्या भूमिकेत दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यावर माया ही एका अतिशय विचित्र अशा रिलेशनशीपमध्ये असल्याचं स्पष्ट होत आहे. तिचा शेजारी नरेन (जयदीप अहलावत) आहे, जो तिचा पाठलाग करतो. विजय वर्मा पोलिस करनच्या भूमिकेत आहे. जे मायाच्या हरवलेल्या पतीचा शोध घेत आहेत.

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Madgulkar theater, Prashant Damle,
ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाबाबत अभिनेते प्रशांत दामले यांची खंत, म्हणाले…
mns protest against pakistani actor film the legend of maula jatt in nashik
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन
Emmy Award nomination for The Night Manager web series
‘द नाइट मॅनेजर’ वेबमालिकेला एमी पुरस्कारासाठी नामांकन; २५ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये सोहळा
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात

आणखी वाचा : लालकृष्ण अडवणींच्या मदतीमुळे विधु विनोद चोप्रा ऑस्कर सोहळ्यासाठी जाऊ शकले; नेमका किस्सा जाणून घ्या

करण आणि नरेनला मायावर संशय येतो पण माया दोघांनाही अडकवण्याचा प्रयत्न करते. आता या चित्रपटात नेमकं सत्य कसं उघडकीस येणार हा सस्पेन्स चित्रपट पाहतानाच आपल्याला समजेल. एकूणच या चित्रपटाचं कथानक हे थरारक असणार आणि यात या कलाकारांचा दांडगा अभिनय पाहायला मिळणार हे तर नक्कीच आहे.

करीना, जयदीप आणि विजय हे तिघेही प्रथमच एकत्र काम करत आहेत. तर विद्या बालनचा ‘कहानी’ दिग्दर्शित करणारे सुजॉय घोष हेच याचंही दिग्दर्शन करणार आहेत. करीना कपूरच्या शेवटची ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये दिसली होती. आमिर खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. करीना ‘जाने जान’मधून ओटीटी विश्वास पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २१ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.