Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham again on OTT : कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला ‘भूल भुलैया 3’ व अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी १ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाले होते. आता हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जातील.
कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षीत ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. दिवाळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), तृप्ती डिमरी (Tripti Dimpri), विद्या बालन व माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर अखेर हा चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख समोर आली आहे.
भूल भुलैया 3 कधी, कुठे पाहता येणार?
Bhool Bhulaiyaa 3 on Netflix : नवीन वर्षाआधी प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज करून हा चित्रपट २७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता तुम्ही घरबसल्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
‘भूल भुलैया 3’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचे बजेट जवळपास १५० कोटी रुपये होते आणि हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात हिट ठरला. या चित्रपटाचे भारतात २६०.०४ कोटी रुपयांची कमाई केली आणि चित्रपटाने जगभरात ३८९.२८ कोटींचा व्यवसाय केला.
हेही वाचा – Video: लोकलने प्रवास करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? सीरिज नेटफ्लिक्सवर आहे ट्रेंडिंग
सिंघम अगेन कुठे पाहता येणार?
कमाईच्या बाबतीत ‘भूल भुलैया 3’ ने रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ला मागे टाकलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. कारण ३५० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने भारतात २४२ कोटी रुपयांची कमाई केली, तर जगभरात ३८९,२८ कोटी रुपयांची कमाई केली.
Singham Again on Prime Video: ‘सिंघम अगेन’देखील २७ डिसेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर पाहता येईल. प्राइम व्हिडीओने यासंदर्भात घोषणा केली आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, दीपिका पादुकोण, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या प्राइम व्हिडीओर पाहता येणार आहे.