Chandu Champion on OTT : ऑगस्टच्या पहिल्या महिन्यात कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘चंदू चॅम्पियन’मध्ये १४ जूनला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. आता ‘चंदू चॅम्पियन’ ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट कधीपासून पाहता येईल ते जाणून घेऊयात.

‘चंदू चॅम्पियन’मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचा पहिला पॅरालिम्पिंग सुवर्णपदक विजेते आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केली नाही, मात्र ज्यांनी चित्रपट पाहिला त्या प्रत्येकाने कार्तिकचे व मुरलीकांत यांच्या कामगिरीचे कौतुक केले. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल तर काळजी करू नका. तुम्हाला हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. ‘चंदू चॅम्पियन’ ९ ऑगस्ट २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. तुम्ही संपूर्ण कुटुंबासह घरी बसून हा चित्रपट बघू शकता.

kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

आर्यन खानने ‘या’ शहरात खरेदी केली ३७ कोटींची मालमत्ता, वडील शाहरुख खानशी आहे खास कनेक्शन

कोण आहेत खरे चंदू चॅम्पियन?

मुरलीकांत पेटकर पूर्वी कुस्ती खेळायचे आणि त्यांना खेळातच करिअर करायचे होते. पण पैसे कमावण्याच्या दबावामुळे ते भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यांनी भारतीय लष्कराकडून बॉक्सिंगला सुरुवात केली. लष्करात असतानाच मुरलीकांत यांना १९६५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात ९ गोळ्या लागल्या होत्या. ते गंभीर जखमी झाले व कोमात गेले, त्यांनी आपला हातही गमावला.

पाच वर्षांत संसार मोडला अन् डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज; नैराश्यातून जडला गंभीर आजार, अभिनेत्री म्हणाली…

आयुष्यात इतक्या समस्या आल्या तरी मुरलीकांत पेटकर हार मानली नाही. त्यांनी १९७२ मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी हे सुवर्णपदक ५० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये जिंकले होते. मुरलीकांत पेटकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

kartik aaryan
कार्तिक आर्यनचे चित्रपटासाठी ट्रान्सफॉर्मेशन (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – पूर्वाश्रमीच्या पतीच्या साखरपुड्यानंतर मानसी नाईकची पहिली पोस्ट, शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

कार्तिक आर्यनचे चित्रपट

कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच ‘भूल भुलैया ३’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असून, विद्या बालनही या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमध्ये ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘पति पत्नी और वो’, ‘लव आज कल’, ‘भूल भुलैया २’, ‘प्यार का पंचनामा’, ‘फ्रेडी’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ सारखे चित्रपट दिले आहेत.

Story img Loader