कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता बनला आहे. याआधी एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिल्यामुळे कार्तिकच्या चित्रपटांची प्रेक्षक आवर्जून वाट बघत असतात. कार्तिकच्या ‘भूल भुलैया २’ने अनेक रेकॉर्ड्स मोडले. पण आता त्याचा आगामी चित्रपट ‘फ्रेडी’ थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेले काही दिवस कार्तिक त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यातील काही चित्रपटांचे शूटिंग त्याने पूर्ण केले असून ते रिलीजसाठी सज्ज आहेत.

कार्तिक काही महिन्यांपूर्वी ‘फ्रेडी’ या चित्रपटावर काम करत होता. त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये नाही, तर डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टरसुद्धा समोर आलं आहे. कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून हे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”
chota dadiyal tiger latest news in marathi
Video : ताडोबातील ‘‘अजीम-ओ-शान शहंशाह” कोण..?

आणखी वाचा : विश्लेषण : ट्विटरची मालकी एलॉन मस्ककडे, आता पुढे काय? तुमचा डेटा सुरक्षित राहणार का?

चित्रपटाच्या पोस्टरवर, कार्तिक हातात रक्ताने बरबटलेल्या हातात दातांचा सेट धरून आहे. त्याचे हावभाव फारच रहस्यमय आहेत, ज्यामुळे आपल्याला चित्रपटात काय पाहायला मिळणार आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. या पोस्टरने खरोखरच ‘फ्रेडी’साठी उत्सुकता निर्माण केली आहे आणि आता प्रत्येकजण चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे.

याबद्दल कार्तिक आर्यन म्हणाला, “‘फ्रेडी’ चित्रपटाचा मला भाग होण्यासाठी संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. या चित्रपटाची कथा अत्यंत वेगळी आहे. या आधी मी अशी कथा कधीही पाहिलेली नव्हती. त्यामुळे ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर हा चित्रपट रिलीज होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल.” दरम्यान, ‘फ्रेडी’ व्यतिरिक्त कार्तिक आर्यनकडे ‘शहजादा’ आणि ‘सत्य प्रेम की कथा’ हे चित्रपट आहेत. शिवाय कबीर खानचा ‘स्ट्रीट फायटर’ आणि हंसल मेहता यांच्या ‘कॅप्टन इंडिया’मध्येही तो झळकणार आहे.

Story img Loader