गेल्या काही वर्षांपासून हिंदी सिनेसृष्टीमध्ये हॉरर कॉमेडी या शैलीमधल्या चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक या शैलीकडे वळले आहेत. कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ हा विनोदी भयपट खूप चालला. या चित्रपटाने १८० कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. या चित्रपटशैलीतला ‘स्त्री’ हा चित्रपट सुपरहिट झाला. असाच एक हॉरर कॉमेडी असलेला चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव आहे ‘फोन भूत’.

‘फोन भूत’मध्ये कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटामध्ये कतरिना एका भूताच्या अवतारामध्ये दिसणार आहे. सिद्धांत आणि ईशान यांच्याकडे भूत पाहण्याची शक्ती असते. ते कतरिनासह मिळून भूत पकडणाऱ्या टोळीची सुरुवात करतात आणि भूतांना मोक्षप्राप्तीसाठी मदत करतात. या दोन मॉर्डन तांत्रिकाचा एका भूताबरोबरचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ यांनी ग्रे शेड असलेली भूमिका केली आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
tharala tar mag audience upset about new track of the serial
खूप बोअर करताय, ठरवून ताणलेली मालिका अन्…; ‘ठरलं तर मग’चा नवीन ट्रॅक पाहून प्रेक्षक नाराज! पुढे काय घडणार?
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे

आणखी वाचा – ‘भोला’च्या सेटवर तब्बूच्या डोक्याला झाली जखम; अजय देवगणने व्हिडीओ शेअर केला व्हिडीओ

या चित्रपटासंबंधित फार महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. चित्रपटगृहांनंतर ‘फोन भूत’ काही कालावधीनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान चित्रपटाच्या ओटीटी रिलीजच्या तारखेबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेने केली आहे. या संस्थेच्या ‘फोन भूत’व्यतिरिक्त आणखी चार चित्रपटांचे डिजीटल हक्क या ओटीटी प्लॅटफॉर्मने खरेदी केले आहेत.

आणखी वाचा – “…तेव्हापासून मी प्रमुख भूमिकेसाठी ऑडिशन देणे बंद केले,” राजकुमार रावने सांगितला धक्कादायक अनुभव

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी सर्वांना आशा होती. पण बॉक्स ऑफिसवरच्या आकड्यांना पाहून प्रेक्षकांचा या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी (शुक्रवारी – ४ नोव्हेंबर) फक्त १.७५ ते २.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘फोन भूत’सह या शुक्रवारी सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा ‘डबल एक्सएल’ आणि जान्हवी कपूरचा ‘मिली’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.