सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलंच उचलून धरलं आहे. आता अशातच केरळची आणखी एक वेगळी गोष्ट सांगणाऱ्या वेबसीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘केरला क्राइम फाइल्स’नावाची पहिलीच मल्याळम वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. या टीझरमधून केरळमधील गुन्हेगारी विश्व, सेक्स वर्कर्सची होणारी हत्या आणि त्याचा तपास अशी एक सस्पेन्स थ्रिलर कथा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

आणखी वाचा : ३२ हजार ही संख्या आली कुठून? ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याचं स्पष्टीकरण

या वेबसीरिजमध्ये लाल आणि अजू वर्गीज हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एका मर्डर मिस्ट्रीमागील रहस्य या वेबसीरिजमधून उलगडणार आहे अन् याचं कथानक या तपासाभोवतीच फिरताना आपल्याला टीझरमधून जाणवत आहे. शिवाय या कथानकात वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.

सस्पेंस थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्रीमध्ये मल्याळम कलाकृतींचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यामुळे ही वेबसीरिजदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडू शकते. ही वेबसीरिज मल्याळम भाषेसह तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मराठी या भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Story img Loader