करण जोहरचा ‘कॉफी विथ करण सीझन ८’ शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. आत्तापर्यंत या सीझनचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. आठव्या सीझनच्या पहिल्या भागात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने हजेरी लावली होती. दुसऱ्या भागात बॉबी आणि सनी देओल तर तिसऱ्या भागात सारा अली खान व अनन्या पांडे दिसले होते. आता प्रेक्षक याच्या पुढील भागाची आतुरतेने वाट बघत आहे. या चौथ्या भागात करीना कपूर आणि आलिया भट्ट हजेरी लावणार आहेत. या भागाचा प्रोमोही प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘लोकी’ म्हणून शाहरुख खान अगदी योग्य; किंग खानच्या ‘देवदास’चा संदर्भ देत टॉम हिडलस्टनने केलं वक्तव्य

दरम्यान या भागामध्ये करीना आणि आलियाने अनेक गुपिते उलगडली आहेत. तसेच करीनाने स्वत:च्या चित्रपटांबाबतही मोठा खुलासा केला आहे. करीना कधीही स्वत:चे चित्रपट बघत नाही. कॉफी विथ करण शोमध्ये करीनाने यामागचे कारणही सांगितले आहे.

करीना म्हणाली की “जेव्हाही मी स्वतःला चित्रपटात पाहते तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटते. मी माझा कोणताही चित्रपट पाहिलेला नाही. सध्या मी अशा ठिकाणी आहे जिथे मी खूप आनंदी शांत आणि तणावमुक्त आहे. सगळं चांगले चालल आहे. अशा परिस्थितीत, जर मी स्वतःकडे बघितलं तर मी स्वतःलाच जज करायला लागेन अस मला वाटते”

हेही वाचा- ‘कॉफी विथ करण’मध्ये अमीषा पटेलबद्दल विचारल्यावर ‘अशी’ होती करीना कपूरची प्रतिक्रिया; अभिनेत्री म्हणाली…

करीना कपूर खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकतचं तिने सुजॉय घोषच्या ‘जाने जान’ या चित्रपटाद्वारे ओटीटीवर पदार्पण केले. या चित्रपटात तिच्याबरोबर विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. करीना लवकरच ‘द क्रू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती तब्बू, क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या ‘सिंघम-३’ मध्येही झळकणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koffee with karan 8 kareena kapoor khan has not watched any of her films actress revel reason dpj