‘कॉफी विथ करण’चे आठवे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. २६ ऑक्टोबरपासून या पर्वाला सुरुवात झाली. आत्तापर्यंत करणच्या या शोमध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. कॉफी विथ करणच्या या नव्या पर्वात, दीपिका-रणबीर आलिया भट्ट, करीना कपूर खान, सनी-बॉबी देओल, सारा अली खान, अनन्या पांडे यांसारखे कलाकार सहभागी झले होते. अलिकडेच करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अभिनेता अर्जून कपूर व आदित्य रॉय कपूर आमंत्रित केले होते. या शोमध्ये अर्जून व आदित्यने आपल्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत.
शोमध्ये करणने आदित्य रॉय कपूरला अनन्या पांडेबरोबरच्या नात्याबाबत प्रश्न विचारले. करण म्हणाला “गेल्या एपिसोडमध्ये मी अनन्याला तुमच्या दोघांच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत प्रश्न विचारला होता. मात्र, त्यावेळेस तिने स्पष्टपणे कोणतेही उत्तर दिले नाही.” यावर उत्तर देत आदित्य म्हणाला की “तू स्वत: या शोमध्ये म्हणाला होतास की तू मला सिक्रेट विचारणार नाहीस आणि मी तुझ्याबरोबर खोटं बोलणार नाही.” यावेळेस आदित्यने अनन्याचे कौतुकही केले. तो म्हणाला, मी खूप आनंद आहे. अनन्या शुद्ध आनंद आहे. “
करणच्या शोमधील कॉफी हॅम्पर जिंकल्यावर, करणने आदित्यला विचारले की तू हे हॅम्पर अनन्याबरोबर शेअर करणार आहे का? यावर उत्तर देत आदित्य म्हणाला बघू. आदित्यच्या या प्रश्नावर खिल्ली उडवत अर्जून म्हणाला, यात शेवटचा पास्ता असला तरी तो शेअर करणार नाही. मात्र, आदित्यच्या चेहऱ्यावरुन त्याला अर्जूनची ही चेष्टा लक्षात आली नसल्याचे दिसून आले. यावर पुन्हा अर्जून म्हणाला, बघ, त्याला हे माहीत नाही. आखरी पास्ता हे चंकी पांडेच्या पात्राचे नाव आहे. एवढेच नाही तर आदित्य रॉय कपूला आपली रुमर्ड गर्लफ्रेंड अनन्या पांडेच्या वडिलांबाबत पुरशी माहिती नसल्याचे दिसून आले. यावरूनही करण व अर्जून कपूरने आदित्यची खूप खिल्ली उडवली.
गेल्या काही महिन्यांपासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर चांगलेच चर्चेत आहेत. मागच्या काही काळापासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र हजेरी लावताना दिसतात. एवढचं नाही तर काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका पार्टीमधील रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, अद्याप दोघांनी आपल्या नात्याबद्दल कोणतीही कबूली दिलेली नाही.