Koffee With Karan Season 8 Updates : करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमाच्या आठव्या सीझनला सध्या प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सीझनच्या पहिल्या भागात रणवीर सिंह-दीपिका पदुकोण या बॉलीवूडच्या लोकप्रिय जोडीने, तर दुसऱ्या भागात सनी व बॉबी देओल यांनी हजेरी लावली होती. तिसऱ्या भागात कोण येणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर करणने प्रोमो शेअर केल्यावर ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकांनी प्रसाद ओकला दिलं खास गिफ्ट, महागड्या भेटवस्तू पाहून काय म्हणाला अभिनेता?

‘कॉफी विथ करण’ सीझन ८ च्या तिसऱ्या भागात बॉलीवूडच्या मैत्रिणी सारा अली खान अनन्या पांडे या स्टारकिड्स सहभागी झाल्या होत्या. सध्या सारा-अनन्या एकाच जिममध्ये एकत्र वर्कआऊट करत असल्याने त्या दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या असल्याचं साराने शोमध्ये सांगितलं.

सारा अली खान व अनन्या पांडे या दोन्ही अभिनेत्री त्यांच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. या शोमध्ये अनन्या पांडेने आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली. तर, सारा अली खानने “मी शुभमन गिलला केव्हाच डेट केलं नाही” असा खुलासा या शोमध्ये केला. यावर करणने दोघींनाही त्यांच्या एका पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडची आठवण करून दिली.

हेही वाचा : रांगोळीत रंग भरून, केक कापून अन्…., ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकारांनी ‘असा’ केला साजरा शूटिंगचा शेवटचा दिवस

सारा व अनन्याने एकाच अभिनेत्याला डेट केल्याचा खुलासा करण जोहरने शोमध्ये केला आहे. करण जोहर म्हणाला, “तुम्ही दोघी आता एकत्र काम करता, खूप चांगल्या मैत्रिणी आहात या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. परंतु, तुम्ही दोघींनीही एकाच अभिनेत्याला डेट केलं आहे. कार्तिक आर्यनशी आज तुम्ही पुन्हा आधीसारखं बोलता. हा प्रवास तुमच्यासाठी सोपा होता की कठीण?” यावर सारा अली खान म्हणाली, “हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. चित्रपटसृष्टीत तुम्ही, मी या व्यक्तीशी पुन्हा कधीच बोलणार नाही असं विधान तुम्ही करू शकत नाही.”

हेही वाचा : “लोकांसाठी सहज उपलब्ध असलेली…”, रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओवर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया

दरम्यान, करण जोहरने कार्तिक आर्यनच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे सारा अली खानबरोबर ब्रेकअप झाल्यावर अनन्याने कार्तिक आर्यनला डेट केल्याच्या चर्चा सुरू आहेत.