‘कोंबडी पळाली’ या गाण्याच्या तालावर सगळ्यांनाच थिरकायला लावणारी अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरला ओळखले जाते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच क्रांती रेडकरने तिला मराठी सिनेसृष्टीतील कोणत्या अभिनेत्याबरोबर डेटवर जायला आवडेल याचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर ही लवकरच रेनबो चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच क्रांतीने प्लॅनेट मराठीवरील पटलं तर घ्या या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने तिचा चित्रपट आणि खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले. यावेळी क्रांतीला तुला मराठी सिनेसृष्टीतील कोणत्या अभिनेत्याबरोबर डेटवर जायला आवडेल, असे विचारण्यात आले.
आणखी वाचा : “प्रेमाने जखम दिली तर…” उर्मिला कोठारेचे बोल्ड वक्तव्य

यावेळी तिला जितेंद्र जोशी, शरद केळकर, सिद्धार्थ जाधव असे तीन पर्यायही देण्यात आले.त्यावर क्रांतीने मला सिद्धार्थ जाधव बरोबर डेटवर जायला नक्कीच आवडेल, असे सांगितले.

“सिद्धार्थ जाधव माझा लहान भाऊ आहे. पण मला त्याच्याबरोबर खरोखरच डेटवर जायचं. कारण काही महिन्यांपूर्वी त्याने मला चार-पाच फोन केले होते. तेव्हा मी कामात होती. त्यानंतर मी त्याला केले होते. तेव्हा तो काही तरी कामात व्यस्त होता. त्यामुळे जर आम्हाला वेळ काढून दिली आणि काही ठराविक गोष्टींवर चर्चा करायची ती करता आली तर नक्कीच मला सिद्धार्थ बरोबर डेटवर जायला आवडेल”, असे क्रांती रेडकर म्हणाली.

दरम्यान क्रांती रेडकर ही सध्या तिच्या आगामी ‘रेनबो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तिने या चित्रपटातील अनेक बिहाईंड द सीन्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री उर्मिला कोठारे, ऋषी सक्सेना हे कलाकार झळकणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar want to date these marathi actor reveled during interview nrp