आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला. त्याने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले, परंतु बहिष्कारामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. मात्र, आता याच ‘लाल सिंग चड्ढा’ने ओटीटीवर संपूर्ण जगाला हादरवले आहे.

आणखी वाचा : प्रदर्शनाच्या आधीच आयुष्मान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ला मोठा फटका, निर्माते निराश

Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tharala Tar Mag Maha Episode Promo Out Arjun Propose to sayali
Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “मी ही बघतेच कशी…”, हळदीच्या कार्यक्रमात भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज; मालिकेत येणार ट्विस्ट
madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन
Savlyachi Janu Savli
Video : “आयुष्यातला अंधार…”, सावली आणि सारंगचे लग्न होणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
tom cruise mission impossible 8 teaser released
Video : खोल समुद्रातील मिशन अन् जबरदस्त अ‍ॅक्शन; टॉम क्रूझच्या ‘Mission Impossible 8’ चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली
Muramba
फिल्मी स्टाइलने अक्षयने रमाला केले प्रपोज; गोड नात्याची नव्याने होणार सुरुवात, ‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट

‘लाल सिंग चड्ढा’ ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ठरलेल्या तारखेच्या आधीच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण आता ‘लाल सिंह चड्ढा’ला ओटीटीवर खूप प्रेम मिळत आहे. गंमत म्हणजे हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर हिंदी व्यतिरिक्त इतर भाषेतही कमाल कामगिरी करत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ ओटीटीवर प्रदर्शित होऊन फक्त आठ दिवस झाले आहेत, पण या काही दिवसांतच या चित्रपटाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ हा एका आठवड्यात नेटफ्लिक्सवर नंबर १ आणि भारतातील नंबर २ नॉन-इंग्लिश चित्रपट बनला आहे. हा चित्रपट संपूर्ण जगभरातून ६.६३ दशलक्ष तास पाहिला गेला आहे आणि मॉरिशस, बांगलादेश, सिंगापूर, ओमान, श्रीलंका, बहरीन, मलेशिया आणि दुबई यासह जगभरातील १३ देशांमधील चित्रपटांमध्ये पहिल्या १० मध्ये याचा आहे. या आठवड्याच्या जागतिक नॉन-इंग्लिश चित्रपटांच्या यादीत चार भारतीय चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत ‘लाल सिंह चड्ढा’चे नावही आहे.

‘लाल सिंह चड्ढा’चे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले होते आणि आमिर खान प्रॉडक्शन्सने याची निर्मिती केली होती. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग, नागा चैतन्य अक्किनेनी आणि मानव विज महत्वपूर्ण भूमिकेत दिसले.

हेही वाचा : आमिर खानच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा येणार सिक्वेल, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सुमारे १८० कोटी खर्च करून तयार करण्यात आला होता. मात्र आमिर खानच्या एका जुन्या वक्तव्यामुळे हा चित्रपट वादात सापडला. सोशल मीडियावर या चित्रपटावर प्रचंड बहिष्कार टाकण्यात आला होता. लोकांनी या चित्रपटाचा आणि आमिर खानला रस्त्यावर उतरूनही विरोध करण्यास सुरुवात केली, ज्याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर झाला. या चित्रपटाचे भारतातील कलेक्शन १०० कोटींचा आकडाही गाठू शकले नाही. या चित्रपटाने जवळपास 70 कोटींची कमाई केली होती. या आता नेटफ्लिक्सवर हा चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.