ओटीटीवर जगभरातील मालिका आणि चित्रपट उपलब्ध आहेत. आता लोक फक्त बॉलीवूड, हॉलीवूड आणि दाक्षिण्याच नव्हे तर जपान, स्पेन व जगातल्या कोणत्याही देशातील शो आरामात घरी बसून पाहू शकतात. यामुळेच दक्षिण कोरियातील ड्रामा भारतात भारतात खूप लोकप्रिय आहे. के-ड्रामाने अल्पावधीच भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकली. तुम्हालाही के-ड्रामा पाहायला आवडत असेल तर आज आम्ही तुम्हाला सत्य घटनांवर आधारित कोरियन ड्रामाबद्दल सांगणार आहोत. तुम्ही ओटीटीवर हे ड्रामा पाहू शकता.
फाइट फॉर माय वे
या सीरिजमध्ये एका फायटरची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जो आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतो. तुम्ही ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या सीरिजमध्ये रोमान्स, कॉमेडी आणि ॲक्शनचा मिलाफ आहे.
टॅक्सी ड्रायव्हर
यामध्ये एका टॅक्सी ड्रायव्हरची कथा आणि एका टॅक्सी कंपनीची कथा दाखवण्यात आली आहे. याची कथा खूपच भावुक करणारी आहे. तुम्हाला टॅक्सी ड्रायव्हर नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
मूव्ह टू हेवन
एस्पर्जर सिंड्रोमने पीडित एक तरुण त्याच्या वडिलांच्या “मूव्ह टू हेवन” नावाच्या व्यवसायासाठी काम करतो. त्यांचे काम मृत लोकांनी मागे सोडलेल्या वस्तूंची व्यवस्था करणं आहे. एके दिवशी त्याच्या वडिलांचाही मृत्यू होतो आणि तो एकटाच राहतो. तुम्ही ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
द हिम ऑफ डेथ (The Hymn OF Death)
ही कहाणी देखील एका सत्य घटनेवर आधारित आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘द हिम ऑफ डेथ’ पाहू शकता. यात एका रायडर आणि गायकाची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे.
सिग्नल
या सीरिजची गोष्ट एका लहान मुलाची आहे जो आपल्यासमोर अपराध होताना पाहतो आणि त्याचा पोलिसांवरचा विश्वास उडतो. मात्र नंतर तो पोलीस अधिकारी बनतो आणि त्याची भेट एका गुप्तहेराशी होते. या सीरिजची गोष्ट खूप रंजक आहे. तुम्ही ती नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
द कर्स्ड (The Cursed)
सीन एलिसने दिग्दर्शित केलेला हा एक भयपट आहे. याची कथा एका किशोरवयीन मुलीवर आधारित आहे जी मृत लोकांची नावं आणि वस्तू वापरून त्यांना या जगात परत आणू शकते. हा तुम्ही एमएक्स प्लेअरवर पाहू शकता.
होमटाउन
‘होमटाउन’ची कथा एका छोट्या शहरातील एका हत्येवर आधारित आहे. ही क्राइम थ्रिलर सीरिज पाहताना तुम्हाला तिच्या क्लायमॅक्सचा अंदाज येणार नाही. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.