प्रत्येक वीकेंडप्रमाणे या वीकेंडलाही तुम्ही अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहत असाल. अनेकांना कोणत्या ना कोणत्या कारणाने सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहता येत नाही, ते घरी बसून ओटीटीवर सीरिज व मालिका पाहतात. अशा प्रेक्षकांसाठी या आठवड्यात एकापेक्षा एक कलाकृती ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. नेटफ्लिक्स, प्राइम,व्हिडीओ, झी 5 वर प्रदर्शित होणारे चित्रपट व सीरिज तुमचा वीकेंड खास बनवतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वीकेंडला ओटीटीवर ॲक्शन, हॉरर, सस्पेन्स आणि कॉमेडी असे सर्व जॉनरमधील चित्रपट ओटीटीवर येत आहेत. कोणते नवीन चित्रपट आणि वेब सीरिज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

आवेशम

‘आवेशम’ हा २०२४ मल्याळम ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट 9 मे २०२४ रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.

आदुजीविथम – द गोट लाइफ

‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ हा मल्याळम सर्व्हायव्हल ड्रामा आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, जिमी जीन-लुईस आणि केआर गोकुळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

8 एएम मेट्रो

ही एक लव्हस्टोरी असून यात गुलशन देवैया व सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १० मे रोजी झी ५ वर रिलीज होईल.

अनदेखी सीझन ३

नंदिश संधू, हर्ष छाया यांची ‘अनदेखी ३’ ही सोनी लिव्हवरील सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. या मालिकेचे पहिले दोन सीझन खूप हिट झाले, आता तिसरा सीझन १० मे रोजी प्रदर्शित होत आहे.

मर्डर इन माहिम

आशुतोष राणा व विजय राज फिजियोलॉजिकल क्राइम थ्रिलर सीरिज ‘मर्डर इन माहिम’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या मर्डर मिस्ट्री सीरिजमध्ये शिवानी रघुवंशी व शिवाजी साटमदेखील दिसतील. ही सीरिज 10 मे रोजी जिओ सिनेमावर रिलीज होईल.

डॉक्टर हू

ही एका डॉक्टराची गोष्ट आहे, जो अंतराळात प्रवास करतो. हा चित्रपट ११ मे पासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

फिएस्को

हा कॉमेडी ड्रामा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. यात पहिल्यांदा चित्रपट बनवणाऱ्या एका चित्रपट निर्मात्याची कथा दाखवण्यात आली आहे.

‘हीरामंडी’ व ‘शैतान’नंतर या आठवड्यात OTT वर येणार ‘हे’ जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वाचा यादी

द वेल

खऱ्या आणि खोट्याचा खेळ खेळत इस्तंबूल ते पॅरिस ते लंडन असा प्रवास करणाऱ्या दोन महिलांची ही कथा आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकाल.

अकापुल्को सीझन ३

या सीरिजचा तिसरा सीझन तुम्ही अॅपल टीव्ही प्लसवर पाहू शकता. यात पुन्हा एकदा नात्यातील चढ-उतार दाखवण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: List of movies and web series released this week on ott netflix prime video hrc