मे महिन्यासाठी ओटीटीवर मनोरंजनासाठी भरपूर कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, डिज्नी प्लस हॉटस्टार, झी 5 आणि जिओ सिनेमासारख्या प्लॅटफॉर्मवर मे महिन्यात बरेच चित्रपट आणि वेब सीरीज रिलीज होणार आहेत. यात संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित सीरिज ‘हीरामंडी’ देखील समाविष्ट आहे. मे महिन्यात अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर येणार आहेत, पाहा त्याची सपूर्ण यादी.

हीरामंडी: द डायमंड बाजार

संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज १ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, संजीदा शेख, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शेखर सुमन, फरदीन खान, अध्यायन सुमन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

सिटाडेल: हनी बनी

वरुण धवन आणि समंथा प्रभू यांची ‘सिटाडेल: हनी बनी’ ही सीरिज अमेरिकन स्पाय थ्रिलर ‘सिटाडेल’चं भारतीय अडॉप्टेशन आहे. ही सीरिज मे महिन्यात प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होऊ शकते.

द ब्रोकन न्यूज सीझन २

या शोचा पहिला सीझन खूप गाजला होता. यात सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावेळी अमिना कुरेशी, दीपांकर सान्याल आणि राधा भार्गव यांच्यातील न्यूज रूम व त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील ड्रामा पाहायला मिळेल. हा शो ३ मे रोजी झी ५ वर येईल.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

वुमन ऑफ माय बिलियन

‘वुमन ऑफ माय बिलियन’ ही डॉक्युमेंटरी ३ मे रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा पायी प्रवास करणाऱ्या एका महिलेची कथा यात दाखवण्यात आली आहे.

शैतान

अजय देवगण व आर. माधवन यांचा चित्रपट ‘शैतान’ थिएटरमध्ये प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता हा चित्रपट ३ मे पासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

मंजुम्मेल बॉईज

मल्याळम चित्रपट ‘मंजुम्मेल बॉईज’ २२ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने २२५ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट ५ मे रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट फक्त मल्याळममध्येच नाही तर तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्येही पाहता येईल.

द आयडिया ऑफ यू

हा एक अमेरिकन रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट २ मे रोजी प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

“दिलीप जोशींच्या मुलाच्या लग्नात…”, ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरची बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल प्रतिक्रिया

हॅक्स

‘हॅक्स’ सीझन तीनचा प्रीमियर २ मे २०२४ रोजी होईल आणि ३० मे पर्यंत दर आठवड्यात या शोचे दोन भाग प्रसारित केले जातील.

वीर सावरकर

रणदीप हुड्डाचा हा चित्रपट थिएटरनंतर आतात ओटीटीवरही येणार आहे. हा चित्रपट मे महिन्यात ZEE5 वर प्रदर्शित होईल.