अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा ही बी-टाऊनमधील नवी जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याचे जाहीर झाले होते. लवकरच दोघांचा पहिला चित्रपट ‘लस्ट स्टोरीज २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये एका किसिंग सीनसाठी तमन्नाने तिची १७ वर्षांची ‘नो किस’ पॉलिसी तोडल्याचा खुलासा विजय वर्माने केला आहे.
इन्स्टंट बॉलिवूडने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विजय वर्मा तमन्नाशी पहिली भेट कशी झाली? आणि किसिंग सीनविषयी बोलताना दिसत आहे. विजय वर्मा म्हणाला की, ‘दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या ऑफिसमध्ये स्क्रिप्ट रीडिंगदरम्यान आम्ही पहिल्यांदा भेटलो. ती आली आणि तिने तिच्या प्रवासाबाबत सांगितले.’
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीच्या पतीचे ‘मुंबई इंडियन्स’शी आहे खास कनेक्शन, जाणून घ्या
या वेळी तिने सांगितले की, ‘मी गेल्या १७ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.’ तर मी म्हणाले, ‘हा मला माहीत आहे.’ मग ती म्हणाले, ‘माझ्या काँट्रॅक्टमध्ये कोणतीही किस पॉलिसी नव्हती. मी यापूर्वी कधीही असे केले नाही. तू पहिला अभिनेता आहेस, ज्याला मी ऑनस्क्रीनवर किस करणार आहे.’ मी तिला या वेळी ‘थँक्यू’ म्हणालो. विजय वर्माने सांगितलेला हा किस्सा ऐकून तमन्ना हसू लागली आणि म्हणाली ‘काहीही.’
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग २९ जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तमन्ना भाटिया, विजय वर्मा, नीना गुप्ता, काजोल, मृणाल ठाकूर, अंगद बेदी, कुमुद मिश्री, अमृता सुभाष यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.