Actor Arjun Mathur married to Tiya Tejpal : ‘मेड इन हेवन’ फेम प्रसिद्ध अभिनेता अर्जुन माथुर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. ४२ वर्षीय अर्जुनने त्याची गर्लफ्रेंड टिया तेजपालशी साधेपणाने लग्न केलं. टिया तेजपालचा भाऊ करण तेजपालने इन्स्टाग्रामवर या दोघांच्या लग्नाचा एक फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली.

अर्जुन माथुरने आतापर्यंत अनेक वेब सीरिज व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याची पत्नी टिया तेजपाल ही प्रॉडक्शन डिझायनर आहे. दोघेही मागील बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते, अखेर ते लग्नबंधनात अडकले आहे. टियाच्या भावाने दोघांच्या लग्नातील एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – शो ७० दिवसांत का संपवला? आर्या जाधवला घराबाहेर काढण्याचा निर्णय योग्य होता का? केदार शिंदे म्हणाले, “आम्ही ३ दिवस…”

फोटोमध्ये टियाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे, तर अर्जुनने लाल रंगाचा कुर्ता घातला आहे. फुलांची सजावट करण्यात आली असून दोघेही फोटोत पूजा करताना दिसत आहेत. टियाबद्दल बोलायचं झाल्यास तिने  ‘लाइफ ऑफ पाय’, ‘रमन राघव’ या सिनेमांसाठी काम केलं आहे.

हेही वाचा – अक्षरांचा अन् अंकांचा गोंधळ, मग सूरज चव्हाण फोन कसा वापरतो? बिग बॉसचा कास्टिंग डायरेक्टर म्हणाला, “त्याने शक्कल…”

अर्जुन-टियाच्या लग्नाचा फोटो

Actor Arjun Mathur married to Tiya Tejpal
अभिनेता अर्जुन माथूर व टिया तेजपाल यांच्या लग्नातील फोटो (सौजन्य – करण तेजपाल इन्स्टाग्राम)

‘मेड इन हेवन’ फेम अर्जुन माथुरने नुकतंच दुसरं लग्न केलं आहे. त्याने २०१० मध्ये सिमरित मल्हीशी लग्न केलं होतं. जवळपास दोन वर्षे एकत्र घालवल्यानंतर अर्जुन आणि सिमरत वेगळे झाले. त्यांचा घटस्फोट २०१२ मध्ये झाला. घटस्फोटाच्या १२ वर्षानंतर अभिनेत्याने त्याच्या गर्लफ्रेंडशी गुपचूप लग्न केलं आहे.

हेही वाचा – लग्नानंतर तीन वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, गोंडस लेकीला दिला जन्म, पोस्ट केली शेअर

अभिनेता अर्जुन माथुरने २०२० मध्ये एक फोटो शेअर करून तो टिया तेजपालबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता ते लग्नबंधनात अडकले आहेत.

Story img Loader