आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान याने ‘महाराज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातील अभिनयासाठी त्याचं खूप कौतुक होत आहे. पहिल्याच चित्रपटात त्याने अवघड भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याचा मुलगा असूनही जुनैद खूप साधा आहे. जुनैद कधीच नखरे दाखवत नाही आणि ऑटोने प्रवास करतो असं त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितलं.

‘इंडिया टुडे’शी बोलताना दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा म्हणाले, “ज्यादिवशी जुनैद नखरे दाखवेल त्यादिवशी मी पार्टी देईन. वर्षभर तो इतर कलाकारांसह माझ्या घरी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायला आला होता. कारण त्याच्या कोर्ट सीन आणि मोनोलॉगसाठी सराव गरजेचा होता. हा सराव माझ्या घरी वर्षभर चालला. नवोदित कलाकारासाठी ही भूमिका कठीण होती. त्यामुळे त्याने स्नेहा आणि माझ्याबरोबर एक वर्ष कठोर प्रशिक्षण घेतले. प्रत्येक वेळी तो रिक्षाने यायचा. माझे कर्मचारीही विचारायचे, ‘हा आमिर खानचा मुलगा आहे का?’ कारण तो खूप साधा व प्रामाणिक आहे.”

Maharaj Review : वादात अडकलेला ‘महाराज’ कसा आहे? आमिर खानच्या मुलाचा पदार्पणाचा चित्रपट पाहावा की नाही? वाचा

जुनैदला ‘महाराज’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान यशराज स्टुडिओमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता, कारण तो ऑटोमध्ये आला होता अशी आठवण मल्होत्रा यांनी सांगितली. “मजेदार गोष्ट अशी की १३ जूनला यशराज फिल्म स्टुडिओत स्क्रीनिंग होतं. जुनैदच्या आजीचा वाढदिवस होता आणि आम्ही त्याची वाट पाहत होतो. जयदीप आणि मी बाहेर उभे होतो, अचानक मला जुनैदचा फोन आला, ‘सर, हे लोक मला आत येऊ देत नाहीत’. मी विचारलं, कोण? तो म्हणाला, ‘यशराजचे सुरक्षा कर्मचारी.’ मी त्याला म्हटलं ‘तू फिल्मचा हिरो आहेस असं त्यांना सांग.’ त्यावर तो म्हणाला की ते लोक यावर विश्वास ठेवत नाहीयेत.”

“मला माहित आहे की माझ्यात…”, पदार्पणाच्या ‘महाराज’ चित्रपटात स्वतःच्या कामाचा आमिर खानच्या मुलाने केला रिव्ह्यू

“मी त्याला चित्रपटाचे पोस्टर दाखवायला सांगितले, पण जुनैद म्हणाला की सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मग मला खाली जाऊन त्यांना सांगावं लागलं की तो हिरो आहे. तो कारऐवजी रिक्षामध्ये त्याठिकाणी आल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोंधळ झाला. तर असा आहे जुनैद. तो त्याचे चित्रपटातील पात्र करसनदास मुळजीसारखाच आहे. तो सामान्य माणूस आहे, ज्याने आपल्या कामात प्रामाणिकपणा दाखवला आहे,” असं दिग्दर्शक म्हणाले.

Like Mother like Daughter! अमृता फडणवीस अन् लेक दिविजाचा Same to Same लूक, पाहा ग्लॅमरस फोटो

“त्याच्यामध्ये अजिबात दिखाऊपणा नाही. आम्ही ३०-४० वेळा एकत्र डिनरला गेलो आहोत, पण त्याने कधीच पापाराझींना बोलावलं नाही. अनेक नवोदित कलाकार त्यांचे दिग्दर्शक किंवा निर्मात्यांसोबत असताना पापाराझी बोलावतात. जेणेकरून पापाराझी त्यांचे फोटो व व्हिडीओ काढून प्रमोशन करतील. पण जुनैद हा त्या कलाकारांपैकी नाही. सध्या तो त्याचा तिसरा चित्रपट करत आहे. त्याचा एक चित्रपट प्रदर्शित झाला, दुसऱ्याचं चित्रीकरण झालं असून तिसऱ्याचे अर्धे चित्रीकरण बाकी आहे,” असं मल्होत्रा म्हणाले.

जुनैदचा आगामी चित्रपट एक प्रेमकथेवर आधारित आहे. यात तो साई पल्लवीबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या दोघांनी चित्रपटाचं जपानमध्ये शूटिंग पूर्ण केलं.

Story img Loader