माणसाची प्रवृत्ती आणि त्याचे निर्णय या दोन्ही गोष्टी त्याला चांगलं की वाईट हे ठरवण्याचा अधिकार, बुद्धी किंवा विवेकवादी विचार प्रदान करत असतात. आयुष्यात येणाऱ्या अनुभवांवरुन माणूस काय चांगलं? काय वाईट? हे ठरवतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असं जे म्हटलं जातं ते प्रत्येक व्यक्ती परत्वे तितकंच बदलतही जातं. अशीच काहीशी खास गोष्ट सांगत गहिरा परिणाम करणारा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘महाराजा’ .

‘महाराजा’ सिनेमा एक अनुभव आहे (Maharaja Movie Review Exprience)

‘महाराजा’ या सिनेमाची कथा काय? हे सांगितलं तर ‘सिनेमा’ म्हणून तो जो अनुभव आहे तोच सांगण्यासारखं आहे. हा सिनेमा अनुभवण्याचा प्रकार आहे. फक्त इतकंच सांगता येईल की ‘महाराजा’ ही गोष्ट एका केशकर्तनकाराची आहे. त्याच्या आयुष्यात एक प्रसंग घडतो आणि त्यानंतर पुढे अनेक गोष्टी घडत जातात, उलगडत जातात. या सगळ्या घटनाक्रमांवर ‘महाराजा’ बेतलेला आहे. विजय सेतुपती, अनुराग कश्यप या दोघांनीही या सिनेमात प्रमुख भूमिका केल्या आहेत. हा सिनेमा म्हणजे एक अशी ट्रिटमेंट आहे ज्यामुळे आपण विचार करतो, अस्वस्थ होतो, अनेकदा यातल्या हिरोच्या जागी, व्हिलनच्या जागी स्वतःला ठेवून पाहतो. अनेक द्वंद्वं आपल्या मनात उचंबळत राहतात.

Bollywood film stars in grip of mafia extortion
चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य

हे पण वाचा- विजय सेतुपतीच्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलाने केलेल्या मारहाणीत मृत्यू; मद्यधुंद लेकाला पोलिसांकडून अटक

भूतकाळ आणि वर्तमान काळ यांचे हातात हात

या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळाची घातलेली अफलातून सांगड. या प्रकारची ट्रिटमेंट दाक्षिणात्य सिनेमांमध्येच पाहण्यास मिळते. हिंदी सिनेमा या पासून अद्याप बराच दूर आहे. फ्लॅशबॅक आणि वर्तमान असे खेळ सरळसरळ काही ओळी लिहून दाखवले जातात, २० वर्षांपूर्वी, १० वर्षांपूर्वी वगैरे.. पण या सिनेमाचं तसं नाही. ‘महाराजा’ सिनेमात आपण तो प्रवास विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप या दोघांसह करतो. सिनेमात काय घडेल? हा प्रसंग नेमका कधीचा आहे ? याचे प्रश्न पडतात आणि आपण प्रेक्षक म्हणून या अप्रतिम कलाकृतीवर खिळून राहतो. संपादनाची शैली म्हणून वर्तमान काळ आणि भूतकाळाचा चपखल वापर करण्यात आला आहे जे अप्रतिम उदाहरण ठरलं आहे.

हा सिनेमा तमिळ, तेलगु आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मूळ सिनेमा तमिळ भाषेत आहे तरीही या सिनेमाला भाषेची तशी गरज नाही. याबाबत जसा ‘पुष्पा’ होता की त्या सिनेमालाही भाषेची गरज नव्हती, कुठल्याही भाषेत पाहिला तरीही तो कळेल असाच होता अगदी त्याच प्रकारे हा सिनेमाही सादर करण्यात आला आहे. १४ जून रोजी हा सिनेमा कुठल्याही खास प्रमोशनशिवाय प्रदर्शित झाला त्यानंतर आता ओटीटीवर आला आहे. तसंच अभिनयाबाबत बोलायचं झाल्यास विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप या दोघांनीही कमाल केली आहे.

विजय सेतुपती आणि अनुराग कश्यपचा दमदार अभिनय (Vijay sethupathi and Anurag Kashyap acting in Maharaja Movie)

विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप या दोघांनी या सिनेमात जे काम केलं आहे त्याला खरंच तोड नाही. एक घटना घडण्यापूर्वीचा विजय सेतुपती घटना घडल्यानंतरचा विजय सेतुपती या दोन्हीचा आलेख उंचावण्याचं काम विजय सेतुपतीने केलं आहे. अनुराग कश्यपच्या आयुष्यातही एक घटना घडते त्यामुळे त्यानेही हे दोन बदल उत्तम प्रकारे दाखवले आहेत. अनुराग कश्यप हा तर खास ट्रिटमेंट देणारा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. पण या सिनेमाने त्याला नवी आणि खास ओळख दिली आहे यात काही शंका नाही. या सिनेमात सचना निमिदास, ममता मोहनदास, नट्टी, भारतीराजा, अभिराम, सिंगमपुली, अरुलदोस मुनशीकांत, विनोद सागर, मणिकंदन यांच्याही भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन निथिलन सामीनाथनने केलं आहे.

निथीलन सामिनाथनचं उत्तम दिग्दर्शन

निथीलन सामिनाथनने आत्तापर्यंत ओबाथ्थने डिक्कू, ओबाथ्थने अद्भुता, कुरुंगु बोम्मई या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. मात्र महाराजा हा त्याचा मास्टरपीस आहे यात काहीही शंका नाही. दिग्दर्शकाने अत्यंत खुबीने सिनेमाची कथा गुंफली आहे. तसंच या सिनेमाचा शेवट पाहून तर अंगावर काटा येतो. पुढचा कितीतरी वेळ आपण प्रेक्षक म्हणून ट्रान्समध्ये जातो. त्यातून बाहेर यायला आपल्याला काहीसा वेळ स्वतःला द्यावा लागतो. सिनेमा रक्तरंजित आहे का? तर होय जरुर. सिनेमा रक्तरंजित आहेच. कारण हा एका सूडाचा प्रवास आहे तो सूड कुणाचा आहे? महाराजा कोण आहे? केशकर्तनकार कोण आहे? सेल्वा कोण आहे? काय घडल्यानंतर कुणाचं आयुष्य बदलतं? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर ‘महाराजा’ घायलाच हवा. याशिवाय दिग्दर्शकाला आणखी एका गोष्टीसाठी हॅट्स ऑफ कारण त्याने नागाचा वापर एक प्रतीक म्हणून केला आहे.

Maharaja Movie Review
महाराजा या सिनेमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे. याच सिनेमातला खास प्रसंग (फोटो सौजन्य-एक्स)

या सिनेमातला नाग हे कसलं प्रतीक आहे?

या सिनेमात जे कलाकार आहेत त्याचसह एका नागाची भूमिका आहे. हा नाग पाहून अनेकांना प्रश्न पडतो की तो का दाखवला गेला? याचं उत्तर शोधलं तर कळतं नागाबाबतही ढोबळमानाने दोन गोष्टी मानल्या जातात. नागाकडे रक्षणकर्ता म्हणूनही पाहिलं जातं आणि नागाकडे सूड घेणारा आणि डूख धरणारा प्राणी म्हणूनही पाहिलं जातं. नाग प्रत्यक्षात कसा असतो माहीत नाही मात्र त्याला पाहिल्यावर हा आपल्याला डसणार तर नाही ना? ही भीती प्रत्येकाला असतेच. शिवाय नाग अनेकदा त्याचीच अंडी खातो अशाही चर्चा होतात. लोकांच्या मनात नागाविषयी असलेल्या या सगळ्या चांगल्या वाईट प्रतीकांचा वापर दिग्दर्शकाने उत्तम पद्धतीने केला आहे. त्यामुळे सिनेमातल्या प्रमुख कलाकारांसह नागाची भूमिकाही महत्त्वाची आहे. हा नाग कसलं प्रतीक आहे? सूड घेण्याचं की रक्षण करणाऱ्याचं? त्याची भूमिका काय? या सगळ्याची उत्तरंही सिनेमा पाहिल्यावर आपोआप मिळतात.

सिनेमाचा शेवटही सून्न करणारा

हा सिनेमा एका प्रसंगाभोवती आणि त्याच्यानंतर घडलेल्या इतर प्रसंगावर बेतला आहे. आपण जशी एक एक प्रसंगाची साखळी जोडत जातो तसा हा सिनेमा आहे. इतकं करुन शेवट काय होईल? जो प्रसंग घडला आहे त्यातून पुढे नेमकं काय होईल? हे प्रश्न आपल्याला पडत असतात. त्यावेळी सिनेमाचा शेवट जवळ आलेला असतो. आता चांगली प्रवृत्ती जिंकणार असं आपण गृहीतही धरतो. तसं काही प्रमाणात होतं. मात्र पूर्णपणे होत नाही. सिनेमाला जो शेवटचा ट्विस्ट दिला आहे तो आपल्याला आणखी एक धक्का देऊन जातो. त्यामुळे ‘महाराजा’ हा मन आणि मेंदूत भिनणारा गोळीबंद अनुभव असलेला चित्रपट आहे. एकही फ्रेम न चुकवता नक्की पाहा.

Story img Loader