बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व जोरदार सुरू आहे. हे पर्व संपण्यासाठी काही आठवडे बाकी आहे. सध्या शोमधील वातावरण भावनिक झालं आहे. कारण स्पर्धकांचे कुटुंबातील सदस्य त्यांना भेटण्यासाठी बिग बॉस ओटीटीच्या घरात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे स्पर्धकांच्या कुटुंबातील सदस्यांना एक टास्कही देण्यात आला आहे. आपल्या व्यक्तीला सोडून घरातील कुठल्याही आवडत्या स्पर्धकाला स्टार द्यायचा आहे. यादरम्यान अभिनेत्री, निर्माती पूजा भट्टला भेटण्यासाठी तिचे वडील लोकप्रिय दिग्दर्शक महेश भट्ट गेले होते. त्यावेळेस त्यांनी बिग बॉसच्या ओटीटीच्या घरातील स्पर्धेकांना त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला. त्यासंबंधीचा व्हिडीओ समोर आला आहे.
‘बिग बॉस लाईव्ह फीड १’ या ट्विटर अकाउंटवरून बिग बॉस ओटीटीच्या घरातील महेश भट्ट यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत महेश भट्ट घरातील सर्व स्पर्धेकांना भेटताना दिसत आहे. ज्यावेळेस ते एल्विश यादवला भेटतात, त्यावेळेस महेश भट्ट त्याला म्हणतात की, “जेव्हा तू रडला तेव्हा मी मनातून रडलो.”
हेही वाचा – Video: लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? ‘बिग बॉस’ फेम सोनाली पाटील म्हणाली…
पुढे महेश भट्ट सर्वांना त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा सांगतात. ते म्हणतात की, “मी दारू पिऊन रस्त्यावर पडलो होतो. यशस्वी होतो, खूप दारू प्यायचो. एकेदिवशी कुठल्यातरी पार्टीवरून येत असताना जुहूच्या रस्त्यावर दारू पिऊन पडलो होतो. सकाळ झाली आणि पाहिलं तर माझ्या चेहऱ्याला एका दगडाचा स्पर्श होत होतो. भररस्त्यावर मी पडलो होतो. थोडासा पाऊस होता. त्यावेळेस माझ्या आतून एक आवाज आला की, महेश भट्ट तू एक मद्यपी झाला आहेस. तू जरी खूप लोकप्रिय दिग्दर्शक असला तरी इतर लोकांप्रमाणे तू रस्त्यावर पडला आहेस.”
हेही वाचा – “मला लोक घाबरतात” स्वतःच्या प्रतिमेविषयी शरद पोंक्षेंचे वक्तव्य, म्हणाले, “…त्यामुळे माझी सटकते”
“मग इथून मी उठलो आणि चालत घरी गेलो. पूजाची छोटी बहीण शाहीन, तिला जवळ घेतलं. तेव्हा मला असं वाटलं की, तिला उलटीसारखं होतं असल्यामुळे तिनं माझ्याजवळून तोंड बाजूला केलं. त्या दिवसांपासून एल्विश ३६ वर्षे मी दारूचा एक थेंब प्यायलो नाही. तो एक क्रांतीचा क्षण होता”, असं महेश भट्ट म्हणाले.
हेही वाचा – लग्नाच्या दोन वर्षांनंतर सिद्धार्थ-मिताली होणार आई-बाबा? अभिनेत्रीच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष
दरम्यान, यावेळी दिग्दर्शक महेश भट्ट यांनी बिग बॉस ओटीटीच्या प्रत्येक स्पर्धकाशी संवाद साधून त्यांना सल्ला दिला. स्पर्धकांच्या खेळाबद्दल आपलं मत व्यक्त केलं.