बॉलीवूडमधील डान्स क्वीन म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा ( Malaika Arora ) नेहमी चर्चेत असते. मलायका कधी तिच्या कामामुळे चर्चेत असते, तर कधी ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये अभिनेत्री १६ वर्षांच्या मुलाला सुनावताना दिसत आहे. नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…
नुकताच अॅमेझोन व एमएक्स प्लेअरवर ‘हिप हॉप इंडिया सीझन २’ हा शो सुरू झाला आहे. या सीझनमध्ये रेमो डिसुझा व मलायका अरोरा ( Malaika Arora ) परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. याच ‘हिप हॉप इंडिया सीझन २’मधील मलायकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मलायका १६ वर्षांच्या मुलावर भडकलेली दिसत आहे. मलायका त्याला म्हणते, “तुझ्या आई-वडिलांचा नंबर सांगा.” तो विचारतो, “का?” तर मलायका म्हणते, “तू १६ वर्षांचा मुलगा आहेस. थेट मला बघत डान्स करतोस. डोळा मारतोस, चुंबन देतोस. हा १६ वर्षांचा मुलगा आहे.” मलायकाचं हे बोलणं ऐकताच उपस्थित असलेले इतर स्पर्धक चिंतेत पडतात. एवढंच या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. पण, प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलाचं नाव नवीन आहे. तो हार्डी संधूचं गाणं ‘क्या बात है’वर जबरदस्त डान्स करतो. नवीनचा डान्स पाहून रेमो डिझुझा, मलायका अरोरा ( Malaika Arora ) हैराण होतात. मलायका म्हणते की, “तुझा फोन नंबर काय आहे?” तेव्हा रेमो म्हणतो की, त्याचा नाही त्याच्या आई-वडिलांचा नंबर विचार. मग मलायका विचारते, “तुझ्या आई-वडिलांचा नंबर सांगा.” म्हणजेच मलायका नवीनचं कौतुक करण्यासाठी त्याची मस्करी करत असते.
दरम्यान, याआधी ‘बेस्ट डान्सर वर्सेज सुपर डान्सर’ या कार्यक्रमात मलायका अरोरा ( Malaika Arora ) परीक्षक म्हणून पाहायला मिळाली होती. ‘सोनी टीव्ही’वरील हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमातील मलायकाचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असे.