बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ४९ वर्षांची आहे. पण आपल्या लूक आणि फिटनेसमुळे ती नव्या आणि तरुण मॉडेल तसेच अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. अर्जुन कपूरबरोबरच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत राहणारी मलायका सध्या तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. नुकतंच या शोमध्ये मलायकाने खुलासा केला की वाढत्या वयाबरोबरच तिला वेगवेगळ्या गोष्टींची नेहमीच भीती सतावत असते. डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीशी बोलताना मलायकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मूव्हिंग इन विथ मलायका’ शोमधून ओटीटी पदार्पण करणाऱ्या मलायकाने आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ती प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहशी बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये भारती सिंह, मलायका अरोराचं वय, काम आणि फिटनेस यावरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. मलायकाचं चालणं, कपडे आणि बॉडी यावरून कमेंट करणाऱ्यांवर भारती सिंह चिडताना दिसत आहे.

आणखी वाचा- Video: मलायकाशी बाचाबाची; नोरा फतेहीने रागाच्या भरात सोडला शो, पाहा नेमकं काय घडलं?

याच व्हिडीओमध्ये पुढे मलायका अरोरा नोरा फतेहीशी बोलताना दिसत आहे. यावेळी मलायकाने कोणत्या गोष्टींमुळे तिला भीती वाटते याचा खुलासा केला. मलायका म्हणाली, “शेवटी मी एक माणूस आहे, असे काही दिवस असतात जेव्हा मी घरी बसून असते माझ्याकडे काहीच काम नसतं. तेव्हा मला वाटत राहातं अरे मी तर हे काम करू शकले असते. हे अनेकदा होतं आणि अशा गोष्टींमुळे कोणीही उध्वस्त होऊ शकतं. कोणी तरुण आहे, सुंदर आहे किंवा कोणी खूप टॅलेंटेड आहे. आयुष्यात आपल्याने नेहमीच वेगवेगळ्या असुरक्षिततेच्या भावनांशी लढावं लागतं.”

आणखी वाचा- “मी अरबाजच्या कुटुंबासाठी कधीच….” घटस्फोटाच्या इतक्या वर्षांनी मलायका अरोराचं खान कुटुंबाबद्दल वक्तव्य

दरम्यान मलायका अरोरा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या तिच्या शोमध्ये स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एका एपिसोडमध्ये तिने अपघाताबद्दल फराह खानला सांगितलं होतं आणि त्यावेळी पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानचाही उल्लेख केला होता. आतापर्यंत मलायकाने अरबाज खानपासून घटस्फोट ते अर्जुन कपूरबरोबरचं नातं यावर या शोमध्ये चर्चा केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora open up about her fear at age of 49 moving in with malaika show mrj