मलायका अरोराचा फॅशन सेन्स आणि आउटफिट्सचे असंख्य चाहते आहेत. अनेकदा ती तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. ४९ वर्षीय मलायकाचा फिटनेस आजही खूपच उत्तम आहे. तिचा फॅशन सेन्सही खूप उत्तम आहे, पण मलायकाचा मुलगा अरहान खानला मात्र त्याच्या आईचा फॅशन सेन्स अजिबात आवडत नसल्याचं ‘मूव्हिंग इन विथ मलायका’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये पाहायला मिळालं. त्याने मलायकाच्या कपड्यांची तुलना टेबल नॅपकिनशी करत तिची खिल्ली उडवली.
मलायका आणि तिचा मुलगा अरहान यांच्या या एपिसोडमध्ये अरहान सातत्याने मलायकाला काही ना काही बोलून त्रास देताना दिसत आहे. या संपूर्ण एपिसोडमध्ये मलायका आणि अरहान यांच्या क्यूट बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. या एपिसोडमध्ये मलायकाने जो टॉप घातला होता त्यात ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती. मात्र या ड्रेसिंगवरून अरहान खानने मलायकाची खिल्ली उडवली.
आणखी वाचा- “आता तुझी जागा मावशी…” मलायका अरोराबद्दल मुलगा अरहान खानचं मोठं वक्तव्य
या एपिसोडमध्ये योगायोगाने मलायकाने घातलेला टॉप आणि डायनिंग टेबलवरील नॅपकिनचा रंग सारखाच असल्याने अरहान खानने तिच्या कपड्यांची तुलना टेबल नॅपकिनशी केली. एवढंच नाही कर तिच्या आउटफिट्सवर कमेंट करत तो म्हणाला, “तू आता एखाद्या तुरुंगातील कैद्यासारखी दिसत आहेस.” अरहानचं बोलणं ऐकून मलायका काहीच बोलू शकली नाही. ती फक्त जोरजोरात हसत राहिली.
आणखी वाचा- मलायकाने कपडे आणि करिअरबद्दल केलेल्या विनोदांवरून बहीण अमृता नाराज; म्हणाली, “तू माझ्याबद्दल…”
दरम्यान त्याआधी अरहान खानने त्याची मावशी अमृता अरोराबरोबर असलेल्या बॉन्डिंगवर भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता, “मी अमूसाठी पक्षपाती आहे. ती तुझ्या (मलायका) जागी येण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते. ती माझ्यासाठी दुसरी आईच आहे. पण आता ती तुझी जागा घेत आहे.” त्यावर मलायका त्याला ‘असं का?’ असा प्रश्न करते. तर तो तिला, ‘सहजच’ असं उत्तर देतो आणि मलायकाचा चेहरा पडतो. अर्थात अरहान नंतर, “मी फक्त मस्करी करत होतो” असं तिला सांगतो.