२०२४ हे वर्ष मल्याळम सिनेमासाठी खूप चांगलं राहिलं आहे. यावर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये ‘प्रेमलू’ सारख्या अनेक चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. ४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने १०० कोटींचा व्यवसाय केला. याने ओटीटीवरही चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मल्याळम चित्रपट पाहायची आवड असेल तर तुम्ही नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने प्लस हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ॲक्शन, सस्पेन्स आणि ड्रामाने चित्रपट पाहू शकता.
प्रेमलू
२०२४ मधील सर्वात मोठा चित्रपट ‘प्रेमलू’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. हा २०२४ चा सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. ४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १०० कोटींचा व्यवसाय केला. यात सचिन संतोषची कथा दाखवण्यात आली आहे, जो यूकेला जाण्याऐवजी हैदराबादमध्ये गेट कोर्स करत असताना प्रेमात पडतो.
मलयाली फ्रॉम इंडिया
‘मलयाली फ्रॉम इंडिया’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यात केरळमधील एका शहरातील एका बेरोजगार माणसाची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपटांपैकी एक आहे.
नादिकर थिलकम
‘नादिकर थिलकम’ हा उत्कृष्ट कॉमेडी ड्रामा चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे. हा सर्वोत्तम मल्याळम चित्रपटांपैकी एक आहे. यात दिव्या पिल्लई, सौबिन शाहीर, बालू वर्गीस, सुरेश कृष्णा आणि भावना यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
वर्षांगलक्कु शेषम
‘वर्षांगलक्कू शेषम’ हा चित्रपट सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा एक पीरियड कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन विनीत श्रीनिवासनने केले असून विशाख सुब्रमण्यम यांनी निर्मिती केली आहे. यात दोन मित्रांची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट ११ एप्रिल २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित झाला.
रंगा
फहद फासिल स्टारर चित्रपट ‘रंगा’ ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. हा एक जबरदस्त कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये फहादची पत्नी नझरिया नझिम हिनेदेखील काम केलं आहे.
पावी केअरटेकर
मल्याळम भाषेतील कॉमेडी ड्रामा फिल्म ‘पावी केअरटेकर’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या चित्रपटाची कथा एका केअरटेकरभोवती फिरते. सिनेमाचं दिग्दर्शन विनीत कुमार यांनी केलं आहे.
अंचकल्लकोक्कन: पोराट्टू
तुम्ही जर ॲक्शन चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्ही ‘अंचकल्लकोक्कन: पोराट्टू’ हा चित्रपट पाहू शकता. यामध्ये जबरदस्त ॲक्शन सिक्वेन्स आहेत. हा चित्रपट तुम्हाला प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
मंजुम्मेल बॉईज
२००६ मधील एका सत्य घटनेवर आधारित ‘मंजुम्मेल बॉईज’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यामध्ये मित्रांचा एक ग्रूप एका गुहेत अडकतो ती गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट फेब्रुवारी २०२४ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. २० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने २२५ कोटींची कमाई केली.