Tribhuvan Mishra CA Topper : ‘त्रिभुवन मिश्रा: सीए टॉपर’ नावाच्या एका वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. ही सीरिज १८ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये मानव कौल, तिलोत्तमा शोम, फैसल मलिक, श्वेता बासू प्रसाद हे कलाकार आहेत. या शोमध्ये तिलोत्तमा व मानव कौल यांचे इंटिमेट सीन्स आहेत, हे सीन शूट करतानाचा अनुभव कलाकारांनी सांगितला आहे.

यामध्ये मानव कौलने त्रिभुवन मिश्रा नावाची मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर असतो आणि तो हे कर्ज फेडू शकत नाही. या कर्जाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी तो सेक्स वर्कर बनतो आणि याचदरम्यान तो तिलोत्तमा शोमच्या जवळ येतो अशी या सीरिजची कथा आहे. ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या तिलोत्तमाने यात मानवबरोबर इंटिमेट सीन दिले आहेत.

‘मिर्झापूर’ मधील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री रसिका दुग्गल म्हणाली, “रिहर्सलच्या वेळीच मला जाणवलं की…”

तिलोत्तमाने सांगितलं की ती मानवला आधीपासून ओळखत नव्हती. या सीरिजच्या शूटिंगदरम्यान ते पहिल्यांदा भेटले. दिग्दर्शक समजदार असल्यास शूटिंगमध्ये अडचण येत नाही असं तिला वाटतं. इंटिमसी को-ऑर्डिनेटरशिवाय हे सीन शूट केले आणि दिग्दर्शकाने दोन्ही कलाकार कंफर्टेबल असतील याची पुरेपूर काळजी घेतली, असं मानव व तिलोत्तमा यांनी सांगितलं.

tribhuvan mishra ca topper
‘त्रिभुवन मिश्रा: सीए टॉपर’चे पोस्टर (फोटो – इन्स्टाग्राम)

मनोज तिवारी खरंच MS Dhoni चे भावोजी आहेत का? स्वतः खुलासा करत म्हणाले…

तिलोत्तमा शोम काय म्हणाली?

‘त्रिभुवन मिश्रा: सीए टॉपर’ या सीरिजमध्ये अनेक इंटिमेट सीन्स आहेत, त्यामुळे शूटिंगदरम्यान कोणी इंटिमसी को-ऑर्डिनेटर होता का? असं विचारल्यावर मानवने सांगितलं की सुरुवातीला तिलोत्तमा एक को-ऑर्डिनेटर असावा अशी मागणी केली होती. पण नंतर तिने आपला विचार बदलला. शूटिंग सुरू होण्यापूर्वी जेव्हा ती कृष्णा आणि गुप्ता यांना भेटली, तेव्हा त्यांनी ते सीन्स कसे शूट करण्याची प्लॅनिंग केली आहे त्याबाबत तिला समजावून सांगितलं. “मी कंफर्टेबल असेन की नाही याची त्यांना काळजी वाटत होती. मला वाटलं की सेटवर मुख्य कलाकारांशिवाय इतर कोणीही नसावं. मला किंवा दुसऱ्या अभिनेत्याला काय हवंय ते निर्मात्यांना सांगण्यासाठी अतिरिक्त लोक तिथे नसले तरी चालेल. मला काही हवं असेल तर त्यासाठी मी पुनीत आणि अमृतशी थेट बोलू शकते,” असं तिलोत्तमा शोम म्हणाली.

अभिषेक बच्चन सुहाना खान अन् अगस्त्य नंदासह फिरायला पडला बाहेर; कारचे ऐश्वर्या रायशी आहे खास कनेक्शन

“प्रत्येकाला प्रत्येक शॉटबद्दल आणि ते कसे शूट करणार आहेत हे माहित होते,” असं मानव कौल म्हणाला. “त्रिभुवन मिश्रा: सीए टॉपरच्या निर्मात्यांनी इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान सेटवर चांगली स्वच्छता राखली आणि नियमांचे पालन केले,” असं मानव व तिलोत्तमा म्हणाले.

Story img Loader