मल्याळम चित्रपट ‘मंजुम्मेल बॉईज’ सध्या चर्चेत आहे. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलंय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाने ३४ दिवसांत २२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाने सिनेमागृहांमध्ये आपल्या बजेटच्या १० पट जास्त कमाई केली आहे. या चित्रपटातील कलाकार व कथा दोन्हीचं खूप कौतुक केलं जात आहे. थिएटरनंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाची ओटीटी डील झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यांना चित्रपटगृहात हा सिनेमा बघता आला नाही, त्यांना तो ओटीटीवर पाहता येईल.

सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

‘मंजुम्मेल बॉईज’ या चित्रपटात एकही अभिनेत्री नाही. ‘मंजुम्मेल बॉईज’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट मित्रांच्या एका ग्रुपवर आधारित आहे. या चित्रपटात काही मित्र कोडाईकनलमध्ये सुट्ट्या घालवायला जातात आणि तिथे त्यांच्यासमोर एक आव्हान येतं, त्या आव्हानाचा ते मित्र कसा सामना करतात यावर सिनेमा बेतलेला आहे. चित्रपटाची कथा खूपच मजेदार आणि भावनिक आहे.

“ते आधीच विवाहित होते,” लग्न गुपित ठेवण्याबद्दल अरुणा इराणींचा खुलासा; मूल होऊ न देण्याबाबत म्हणाल्या, “तो निर्णय…”

‘मंजुम्मेल बॉईज’ च्या ओटीटी प्रदर्शनाचे हक्क डिस्ने प्लस हॉटस्टारने विकत घेतले आहेत आणि हा चित्रपट ५ मे रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाचं हिंदीत डब केलेलं व्हर्जन पाहायला मिळेल की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. कारण निर्मात्यांकडून अशी कोणतीही घोषणा अद्याप केलेली नाही.

“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचं झाल्यास यात शोबिन शाहीर, श्रीनाथ भासी, बालू वर्गीस, गणपती एस. पोडुवल, लाल ज्युनियर, दीपक परंबोल, अभिराम राधाकृष्णन, अरुण कुरियन, खालिद रहमान, चंदू सलीम कुमार आणि विष्णू रेघू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन चिदंबरम यांचं आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manjummel boys movie to release ott superhit film without heroine hrc