अभिनेते मनोज बाजपेयी हे बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेते आहेत. आतापर्यंत अनेक विविध विषयांवरील चित्रपटांतून त्यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्यांची हिंदी भाषेवरही मजबूत पकड आहे. चित्रपटांबरोबरच मनोज यांनी ओटीटी क्षेत्रातही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मनोज बाजपेयी यांची ‘द फॅमिली मॅन’ बेवसिरीज चांगलीच गाजली होती. या बेबसिरीजचे दोन्ही सीझनलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या सीझननंतर याच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मध्यंतरी या सीरिजच्या तिसऱ्या सीझनबद्दल अपडेट समोर येणार अशी चर्चा होती, परंतु तशी बातमी अद्याप समोर आलेली नाही. आता खुद्द मनोज बाजपेयी यांनीच याच्या तिसऱ्या सीझनबद्दल भाष्य केलं आहे. याबद्दल बोलताना मनोज यांनी प्रेक्षकांकडे काही ठराविक वेळेची मागणी केली आहे.

आणखी वाचा : ‘टायगर वर्सेज पठाण’बद्दल सलमान खानने केलं स्पष्ट भाष्य; म्हणाला, “टायगर हा कायम…”

कोईमोईशी संवाद साधताना मनोज म्हणाले, “सीझन २ येऊन दोन वर्षे लोटली आहेत आणि आपण हे मान्य करायलाच हवं की याच्या पुढील सीझनसाठी प्रेक्षक व चाहते चांगलेच उत्सुक आहेत. यावर काम सुरू आहे अद्याप बरंच काम बाकी आहे. राज आणि डिके यांना हा तिसरा सीझन घाई गडबडीत आणायचा नाहीये. सीझन १ नंतर दुसऱ्या सीझनसाठी आम्हाला तीन वर्षं लागली होती. किमान तेवढा वेळ तरी आम्हाला द्यावा अशी माफक अपेक्षा आहे. एका गोष्टीची मी खात्री देतो सीझन २ पेक्षा सीझन ३ तुमचं आणखी उत्तम मनोरंजन करेल.”

नुकतंच मनोज बाजपेयी हे ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटात झळकले व त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं, परंतु चाहते त्यांना श्रीकांत तिवारीच्या अवतारात पाहण्यासाठी फारच उतावीळ झाले आहेत. या सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. राज व डीके यांनी यानंतर शाहिद कपूरबरोबर ‘फर्जी’ ही वेबसीरिज प्रेक्षकांसमोर आणली व त्यातही ‘द फॅमिली मॅन’चे काही संदर्भ आपल्याला पाहायला मिळाले. तेव्हापासूनच राज आणि डिके हे या सीरिजचे युनिव्हर्स करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpayee answers when the family man season 3 will release avn