एखाद्या सणाच्या दिवशी प्रदर्शित होणारे चित्रपट जास्त चालतात असे म्हटले जाते. म्हणजे सणाच्या निमित्ताने लोकांना सुट्टी असते. सुट्टी असल्यामुळे ते कुटुंबियांसह किंवा मित्रमैत्रिणींसह घराबाहेर मजामस्ती करत असतात. त्याशिवाय सुट्टी आहे म्हणून बरेचसे लोक चित्रपट पाहण्याचा प्लॅन देखील करत असतात. याचा फायदा चित्रपटांना होतो आणि त्यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढत जाते. मध्यंतरी शाहरुखचे चित्रपट दिवाळीला, सलमान खानचे चित्रपट ईदला आणि आमिरचे चित्रपट नाताळमध्ये प्रदर्शित व्हायचे. काही वेळेस दिवाळसणाला शाहरुखचे दोन चित्रपट आमने सामने असायचे.

सध्या ओटीटीवर अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अभिनेत्री मानवी गाग्रूच्या दोन वेब सीरिज यंदाच्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. टिव्हीएफच्या ‘ट्रिपलिंग’ या लोकप्रिय सीरिजचा तिसरा सीझन २१ ऑक्टोबर रोजी झी 5 वर दाखल होणार आहे. याच दिवशी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ‘फोर मोर शॉर्ट्स प्लिज’ या सीरिजचा नवा सीझन प्रसारित होणार आहे. या दोन्ही वेब सीरिजमध्ये मानवी गाग्रू महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याबाबत इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “सध्या मी ओटीटीची शाहरुख खान आहे असे वाटते.”

आणखी वाचा – “भारतीय प्रेक्षक खूप…” अभिनेता, दिग्दर्शक रिषभ शेट्टीने उलगडलं ‘कांतारा’च्या यशामागील रहस्य

ती पुढे म्हणाली, “टिव्हीएफच्या ‘पिचर्स’ या सीरिजमुळे लोकांना माझा चेहरा लक्षात राहिला. ‘ट्रिपलिंग’ पाहून प्रेक्षक मला ओळखायला लागले. त्या सीरिजमुळे मला खरी ओळख मिळाली. पिचर्सच्या आधी जेव्हा मी ऑडिशन द्यायला जायते तेव्हा मला एकाच प्रकारच्या साच्यामध्ये बसतील अशा भूमिका माझ्या वाट्याला यायच्या. मी त्यावेळी काम सोडायचा विचार करत होते. पण या दोन कलाकृतींमुळे माझ्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.”

आणखी वाचा – समांथाबरोबर काम करण्यास सलमान खानने दिला नकार, कारण…

चंदन, चंचल आणि चितवन या तीन भावंडांची गोष्ट ‘ट्रिपलिंग’ या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. तर ‘फोर मोर शॉर्ट्स प्लिज’ या सीरिजचे कथानक चार मैत्रिणींच्या नातेसंबंधांवर आणि त्याच्या वैयक्तिक जीवनावर आधारित आहे. दोन वेगळ्या धाटणीच्या कलाकृतींमध्ये मानवीने दोन टोकाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader