‘दुरंगा’ या वेब सीरिजचे दुसरे पर्व २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. झी 5 वरील ही सीरिज कोरियन ड्रामा ‘फ्लॉवर ऑफ एव्हिल’ वरून हिंदीमध्ये बनवण्यात आली आहे. पहिल्या सीझनचे प्रीमियर १९ ऑगस्ट २०२२ रोजी झाले होते. याच्या दोन्ही पर्वात गुलशन देविया, दृष्टी धामी, अमित साध, अभिजीत खांडकेकर यांच्या भूमिका आहेत.

तोकड्या कपड्यांमुळे उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मराठमोळा अभिनेता अभिजीत खांडकेकरने यामध्ये विकास सरोदे नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील त्याच्या सर्वात कठीण सीनबद्दल बोलताना अभिजीत ‘डीएनए’ला म्हणाला, “पहिल्या सीझनमध्ये एक सीन आहे जिथून सर्वकाही सुरू होतं. मी अभिषेकच्या (गुलशन देविया) वर्कशॉपमध्ये त्याला भेटण्यासाठी जातो आणि अभिषेक मला पकडतो आणि माझे अपहरण करतो. पण या सीनचे आम्ही तसे रिहर्सल केले नाही, अभिषेकने मला मागून पकडले आणि माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोन-तीन रिहर्सल केल्यावर, गुलशन आणि मी दोघेही सीनबद्दल खूप गंभीर आणि सावध होतो. पण तरीही मी थोडा गुदमरलो होतो. यात कोणाचाही दोष नव्हता, पण त्या क्षणी आम्ही दोघेही इतके भूमिकेत शिरलो होतो की मी बेशुद्ध पडेन असं वाटलं होतं.”

दरम्यान, ‘दुरंगा’ या सीरिजच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्या पर्वाचंही खूप कौतुक होत आहे. कलाकारांची त्यांच्या भूमिका उत्तम पद्धतीने वठवल्या आहेत. या सीरिजचं दुसरं पर्व तिथून सुरू होतं, जिथे पहिलं पर्व संपलं होतं. ‘दुरंगा २’ चे आठ एपिसोड आहेत. पहिल्या भागात जो थरार आणि सस्पेन्स होता तो यावेळीही कायम ठेवण्यात आला आहे. ही सीरिज प्रेक्षकांना झी 5 वर पाहता येईल.

Story img Loader