नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. उत्तम अभिनय शैली आणि योग्य कथानकांची निवड यामुळे अमेयचा चाहतावर्ग अफाट आहे. तो सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. अमेय वाघ नुकताच मी वसंतराव’ या चित्रपटात दिसला होता. आत अमेयच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.

अमेय वाघ आता आपल्याला हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ‘गोविंदा नाम मेरा’ या हिंदी चित्रपटात तो आपल्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे . या चित्रपटात तो विकी कौशलच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून तरी तो एका वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर विकी कौशलनेदेखील कॉमेंट केली आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

Govinda Naam Mera Trailer: कॉमेडी सस्पेन्सने भरलेला ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; विकी कौशलचा धमाकेदार अंदाज

या चित्रपटामध्ये विकी कौशल गोविंदा वाघमारे ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे. भूमी पेडणेकरने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे तर कियारा अडवाणी त्याची प्रेयसी दाखवली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट सस्पेन्स कॉमेडी असणार आहे. अमेयच्या बरोबरीने या चित्रपटात सयाजी शिंदेदेखील आहेत. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.

दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फास्टर फेणे’ किंवा ‘अमर फोटो स्टुडिओ’ यासारख्या अनेक चित्रपटांसह मालिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच असुर, सेक्रेड गेम्स यासारख्या हिंदी वेबसिरीज मध्ये काम केले आहे.

Story img Loader