मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार आता हिंदीत आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवतं आहेत. सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, अनुजा साठे, क्षिती जोग, अमेय वाघ, जितेंद्र जोशी अशा बऱ्याच कलाकारांनी हिंदीत उत्तम अभिनयानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता यादीमध्ये मराठी मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याचेही नाव सामील झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा लोकप्रिय अभिनेता गेल्या बऱ्याच काळापासून मराठी मालिकाविश्वातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच या अभिनेत्याने नाटक व चित्रपटातही काम केलं आहे. आता हा अभिनेता लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. याचा खुलासा त्यानं स्वतः एका मुलाखतीमधून केला आहे.

हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेत्याने शशांक केतकरवर केलेली टीका; अनुभव सांगत म्हणाला, “अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले…”

मराठी मालिकाविश्वातील हा लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. त्यानं नुकतीच’मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी शशांकने तो लवकरच करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याचा खुलासा केला. तो म्हणाला की, “‘हॉटस्टार’साठी एक वेब सीरिज केली आहे, जी करण जोहरची आहे. पण, खूप छोटसं काम आहे. माझे सगळे सीन इमरान हाश्मीबरोबर आहेत. आम्ही फक्त मिठी मारलीये. त्याच्यापलीकडे आम्ही काही केलं नाहीये.”

हेही वाचा – अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार? जाणून घ्या कारण

हेही वाचा – Video: “नवरा दुसऱ्या मुलींबरोबर…” अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या ‘त्या’ रीलवर नेटकऱ्याची कमेंट, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या…

शिवाय शशांक ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या हंसल मेहता यांच्या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत आणि वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. जे. के. म्हणजेच जयंत करमरकर असं शशांकच्या भूमिकेचं नाव आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shashank ketkar playing role in karan johar upcoming web series pps