‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. सध्या शशांक केतकर स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. यात तो जयंत करमरकर हे पात्र साकारत आहे. यानिमित्ताने शशांकने स्टँप पेपर घोटाळ्याचा मुख्य आरोपी असलेल्या अब्दुल करीम तेलगीबद्दल मोठा खुलासा केला आहे.

स्टँप पेपर घोटाळ्याचा मुख्य आरोपी असलेल्या अब्दुल करीम तेलगीने घोटाळा कसा केला हे दाखवणारी वेबसीरिज नुकतीच प्रसिद्ध झाली. या वेबसीरिजमध्ये नंदू माधव, भरत जाधव, समीर धर्माधिकारी, शशांक केतकर पाहायला मिळत आहेत. शशांक केतकर हा या सीरिजमध्ये जयंत करमरकर हे पात्र साकारत आहे. सध्या या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने शशांक केतकरने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मी अब्दुल करीम तेलगीला पाहिलं होत, असा खुलासा केला.
आणखी वाचा : प्रियांका चोप्राच्या दीराचा होणार घटस्फोट, लग्नानंतर ४ वर्षांनी जो जोनस-सोफी होणार विभक्त

Tamil filmmaker slapped Padmapriya publicly
दिग्दर्शकाने सर्वांसमोर कानाखाली मारली अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
rajesh kumar farming days
२ कोटींचे कर्ज, मुलाच्या शाळेबाहेर भाजीपाला विकला; प्रसिद्ध अभिनेता ‘तो’ प्रसंग सांगताना झाला भावुक, म्हणाला, “लोक मला वेडा…”
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन
salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?
two wheeler entered into actor salman khan s convoy police registered case against biker
अभिनेता सलमान खानच्या ताफ्यात दुचाकी शिरली, दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल

“मी एका शॉर्ट फिल्मसाठी पुण्यातील येरवडा तुरुंगात गेलो होतो. यावेळी तुरुंगातील एका पोलिसांनी मला खुर्चीवर बसलेल्या एका माणसाकडे बोट दाखवले आणि म्हणाले तो बसला आहे तो अब्दुल करीम तेलगी. त्याने स्टँप पेपरचा घोटाळा केला आहे. त्यावेळी पांढरे कपडे घालून खुर्चीवर बसलेला आणि ऊन खात पेपर वाचत बसलेल्या तेलगीची आठवण कायमस्वरुपी डोक्यात कोरली गेली.

मी खऱ्या अब्दुलला बघितलं आहे आणि आज त्याच्याच जीवनावर आधारीत वेबसिरीजमध्ये काम करायला मिळाले आहे. एक सर्कल पूर्ण झाल्यासारखं मला वाटते”, असे शशांक केतकरने सांगितले.

आणखी वाचा : “१० वर्षांपूर्वी घराची नोंदणी केली, पण…”, शशांक केतकरची मोठी फसवणूक; म्हणाला “बिल्डरला…”

दरम्यान ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही सीरिज २ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित करण्यात आली आहे. या सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली आहे. तर याचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. या सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका अभिनेते गगन देव रियार साकारणार आहेत.