‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. सध्या शशांक केतकर ‘स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. यात तो जयंत करमरकर हे पात्र साकारत आहे. नुकतंच त्याने मराठी कलाकारांबद्दल भाष्य केले आहे.

स्टँप पेपर घोटाळ्याचा मुख्य आरोपी असलेल्या अब्दुल करीम तेलगीने घोटाळा कसा केला हे दाखवणारी वेबसीरिज नुकतीच प्रसिद्ध झाली. या वेबसीरिजमध्ये नंदू माधव, भरत जाधव, समीर धर्माधिकारी, शशांक केतकर पाहायला मिळत आहेत. शशांक केतकर हा या सीरिजमध्ये जयंत करमरकर हे पात्र साकारत आहे. सध्या या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “१० वर्षांपूर्वी घराची नोंदणी केली, पण…”, शशांक केतकरची मोठी फसवणूक; म्हणाला “बिल्डरला…”

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तेजू-शत्रूने शेअर केला व्हिडीओ; अधोक्षज कऱ्हाडेच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो

नुकतंच त्याला मराठी कलाकार आणि त्यांच्या कामाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर तो म्हणाला, “मराठी कलाकार एका टेकमध्ये त्यांना दिलेली व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारू शकतात हे हिंदीतील दिग्दर्शकांना माहिती आहे.”

“त्यामुळे अनेकदा माध्यम कोणतंही असलं तरी मराठी कलाकारांशिवाय पर्याय नसतो. ‘स्कॅम २००३’ सीरिजमध्ये भरत जाधव, नंदु माधव, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि विद्याधर जोशी ही कलाकार मंडळी बघायला मिळतील. त्यामुळे शूटींगच्या ठिकाणी घरच्यासारखं खेळीमेळीचं वातावरण होतं”, असे शशांक केतकरने म्हटले.

आणखी वाचा : “…त्यात घर चालत नव्हतं”, शशांक केतकरने केला मालिकेच्या मानधनाबद्दल खुलासा, म्हणाला “१२०० रुपये…”

दरम्यान ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही सीरिज २ सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित करण्यात आली आहे. या सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली आहे. तर याचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. या सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका अभिनेते गगन देव रियार साकारणार आहेत.

Story img Loader