मराठी कलाकार अभिनयाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. दररोजच्या घडामोडींवर ते परखड मतं मांडत असतात. त्यामुळे कधी कधी त्यांना ट्रोलिंगचाही सामनाही करावा लागतो. पण, त्यालाही ते चोख उत्तरं देतात. सध्या हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेता सुव्रत जोशी यानं त्याच्या पोस्टद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ओटीटीवरील सेक्स व हिंसा या विषयांवर सुव्रतनं एक पोस्ट लिहिली आहे; ज्यावर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. तसेच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनाही सुव्रत उत्तरं देताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता सुव्रत जोशीनं सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमध्ये दोन निरागस प्रश्न विचारताना लिहिलेय, “स्त्रियांवर राजरोस होणाऱ्या प्रचंड लैंगिक हिंसाचारावर तोंडातून ब्र न काढणारे, ओटीटीवरील काल्पनिक गोष्टींमधील हिंसाचाराविषयी इतके चिंतातुर का असतात? त्यांनी तसे काही सर्च केले आहे का? कारण- माझा अल्गोरिदम (Algorithm) मला सेक्स व हिंसा यांचा दुरापास्तही संबंध नसलेले बरेच कार्यक्रम दाखवतो आहे.”

अभिनेत्याच्या या पोस्टवरील प्रतिक्रियेत एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, “केवळ सर्च केल्यावरच नाही तर असाही अनुभव आहे की, तुमच्या स्मार्टफोनचा माईक २४ तास ऐकत असतो. त्यानुसारही अल्गोरिदम काम करतो.” त्यावर सुव्रत म्हणाला, “मग हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या आयुष्यातील निवडीप्रमाणे तो रिझल्ट असतो. त्यामुळे ओटीटीवरील विषयाशी याचा काहीही संबंधच नसतो. तसेच जे विज्ञानप्रेमी आहेत, कलाप्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत; एकंदरीत ज्या लोकांना या जगाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे, त्यांच्यासाठी आताचा ओटीटी काळ हा सर्वोत्कृष्ट आहे. आधीपेक्षा आता भरपूर प्रमाणात चांगले विषय उपलब्ध आहेत ना?” त्यावर तो नेटकरी म्हणतो, “अगदी बरोबर.”

हेही वाचा – “पाल, सरडा, साप यांना मी हाताने उचलू शकते पण….” अभिनेत्री जुई गडकरीला वाटते ‘याची’ भीती, म्हणाली “जवळ आलं तरी…”

तर दुसऱ्या नेटकरी महिलेनं लिहिलं आहे, “पण हे मान्य करशील की, कुटुंबाबरोबर बघण्यासारख्या खूप कमी कलाकृती आहेत. विशेषतः लहान मुलांकरिता ज्या सीरिज आहेत, ‘जस्ट अॅड मॅजिक’ किंवा ‘यंग शेल्डन’ यामध्ये जशी क्रिएटिव्हीटी आहे, त्यामध्ये आपले क्रिएटर कमी पडत आहेत. कदाचित सेक्स व हिंसा विषयावरील गोष्टी टीआरपी अधिक वाढवत असतील. जर माझं मत चुकत असेल, तर दुरुस्त करा.” त्यावर तो म्हणाला, “मी तुमच्या मताशी असहमत आहे. मी उद्या तुम्हाला काही शोंची एक यादी देईन; पण तुम्ही तुमच्या कुटुंबाला ज्या गोष्टींची सवय नाही, त्या पाहण्यासाठी (अॅडल्ट नाही; तर दुसऱ्या गोष्टी) प्रोत्साहित केले पाहिजे.”

हेही वाचा – “तब तक के लिये.. अलविदा”; ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अभिनेत्रीच्या पोस्टने वेधले लक्ष; म्हणाली…

हेही वाचा – नम्रता संभेरावसाठी ‘या’ अभिनेत्रीने बनवला खास चहा; पाहा व्हिडीओ

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने ओटीटीवरच्या सेक्स व हिंसा या विषयांवरील वेब सीरिजबद्दल स्पष्ट मत मांडले होते. “सेक्स व हिंसा या विषयांवर असलेल्या सीरिज मला त्रास देतात. माझ्यासाठी डोकं ठिकाणावर ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे,” असं मधुराणी म्हणाली होती. तसेच बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल व ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनीही ओटीटीवरील आक्षेपार्ह विषयावर संतप्त प्रतिक्रिया मांडली होती.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor suvrat joshi share post about sex and violence content on ott platform pps