मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. ‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यांसारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. विजू माने यांच्या ‘स्ट्रगलर साला’ वेबसीरिजचे असंख्य चाहते आहेत. यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या संघर्षाबद्दलच्या आठवणी सांगितल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजू माने, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजीत चव्हाण यांची ‘स्ट्रगलर साला’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. या वेबसिरीजचे अनेक एपिसोड आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या वेबसिरीजला प्रेक्षकही भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. यानिमित्ताने नुकतंच विजू माने यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संघर्ष काळाबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “सतीश तारेंसारखा दुसरा नट…”, वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “त्यांना किंग ऑफ टायमिंग…”

“स्ट्रगलर साला ही सीरिज अंत्यत नैसर्गिक आहे. आम्ही त्यावेळी केलेला संघर्षही तसाच नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या भागात पाण्यात बिस्कीट बुडवून खाण्याचा जो प्रसंग आहे, तो आम्ही कलाकार जगलो आहोत. आम्ही एक वडापाव खाऊन संपूर्ण दिवस काढला आहे”, असे विजू माने यांनी सांगितले.

“अनेकदा आम्ही मित्राच्या घरी बसून कॅरम खेळायचो. कारण त्यावेळी काही काम नव्हती. त्यावेळी आम्ही एक रुपया, बारा आणे असे पैसे जमा करुन वडापाव खायचो. त्यावेळी रवी करमरकर जो आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे दिग्दर्शन करतो, त्याच्या घरी आम्ही १५-१६ जण कॅरम खेळायला बसायचो. दुपारी वडापाव खायचो. संध्याकाळी चहा प्यायचा असं वाटलं तर दुधासाठी पैसे गोळा करायचो आणि मग चहा प्यायचो. आम्ही हे सगळं आयुष्य जगलो आहोत. त्यात काहीही वेगळं नाही. त्यामुळे मग आम्ही जे जगलो आहोत, तेच पडद्यावर दाखवतो”, असे विजू माने म्हणाले.

आणखी वाचा : “अखेर मला अधिकृतरित्या…” प्रथमेश लघाटेच्या पोस्टने वेधलं लक्ष, फोटो शेअर करत म्हणाला…

दरम्यान विजू माने यांची ‘स्ट्रगलर साला’ ही वेबसीरिज कायमच चर्चेत असते. या वेबसीरिजमध्ये कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि विजू माने हे कलाकार धमाल करताना दिसतात. त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकही उदंड प्रतिसाद देताना दिसतात.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor viju mane talk about struggling life during starting days struggler sala webseries nrp