मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सातत्याने चर्चेत असते. ती कायमच तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्ये ती झळकली होती. या वेबसीरिजदरम्यान ती गुटखा खायची, असं अनेकदा बोललं जायचं. नुकतंच प्राजक्ता माळीने याबद्दल भाष्य केले आहे.

प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेली ‘रानबाजार’ ही वेबसीरिज चांगलीच गाजली होती. यात तिने कामाठीपुरामधील सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. रत्ना असे तिच्या पात्राचे नावं होतं. यावेळी तिने काही बोल्ड सीनही दिले होते. ज्यावरुन तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
pune mahametro loksatta news
‘महामेट्रो’कडून हवाईप्रवाशांसाठी विशेष सुविधा, कसा होणार फायदा?
Sanjay Raut
Ladki Bahin Yojana : “१५०० रुपयांच्या बदल्यात बहि‍णींच्या घरात दारूडे…”; लाडकी बहीण योजनेवरून राऊतांची अजित पवारांवर टीका
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!

यातील काही दृश्यांमध्ये प्राजक्ता ही गुटखा खात असल्याचे दिसले होते. यावरुन प्राजक्ता ही कायम गुटखा खात असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण नुकतंच ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमादरम्यान प्राजक्ताने यावर भाष्य केले.

यावेळी प्राजक्ताला तू ‘रानबाजार’ वेबसीरिजदरम्यान साकारलेल्या पात्रासाठी खरंच गुटखा खायची? असे तिला विचारण्यात आले. त्यावर तिने नाही असे एका सेकंदात म्हटले.

आणखी वाचा : “माझं ब्रेकअप झालं होतं अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

“त्यावेळी मी बडीशेप खायचे. त्या पॅकेटमध्ये बडीशेप असायची. त्याचं पॅकेजिंग सारखंच असायचं. पण त्याच्या आत असलेला माल मात्र वेगळा असायचा. हे शक्यच नाही”, असे प्राजक्ता म्हणाली.

दरम्यान प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेली ‘रानबाजार’ ही सीरिज सुपरहिट ठरली होती. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली होती. गेल्या २० मे रोजी ‘रानबाजार’ ही वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाली.

Story img Loader