मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेली होती. त्यावेळी तिने त्यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. “लग्न करणं गरजेचंच आहे का?” असे प्राजक्ताने विचारले होते. त्यानंतर तिच्या लग्नाबद्दल सातत्याने चर्चा रंगल्या होत्या. आता प्राजक्ताने ती लग्न का करत नाही, याबद्दल सांगितले आहे.
प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच प्राजक्ताने प्लॅनेट मराठीवरील पटलं तर घ्या या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिला आम्ही असं ऐकलंय या टास्कदरम्यान तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी प्राजक्ताने स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट
‘तू पुढच्या वर्षी लग्न करतेस’, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर प्राजक्ताने अरे “हे दरवर्षी म्हटलं जातं. २०१८ पासून हे सर्व सुरु आहे. यावर्षी नाही नाही पुढच्या वर्षी असं सर्व सुरु आहे. हे सुरुच आहे. पण अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मी लग्न करु नये.”
“काहींना वाटतंय मी लग्न करावं, काहींना वाटतंय मी करु नये. त्यांच्यामुळे माझं लग्न रखडतंय. त्या मुलांमुळे माझं लग्न रखडतंय. त्या मुलांची अशी इच्छा आहे की मला हिला भेटायचं, त्याशिवाय हिचं लग्न झालं नाही पाहिजे. त्यामुळे माझ लग्न रखडलंय”, असे प्राजक्ता माळीने म्हटले.
आणखी वाचा : “त्या पॅकेटमधील माल…” ‘रानबाजार’मध्ये गुटखा खाण्याबद्दल प्राजक्ता माळीचे थेट वक्तव्य
दरम्यान प्राजक्ता माळीने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल खास गोष्टी शेअर केल्या होत्या. यावेळी तिने मी लग्न करायला तयार आहे, असे म्हटले होते. मात्र माझी एक अट आहे, असेही तिने सांगितले होते.