मराठी सिनेसृष्टीतील निखळ हास्य आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. सध्या तिच्या लग्नाची सातत्याने चर्चा सुरु आहे. नुकतंच प्राजक्ता माळीने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी प्राजक्ताने स्पष्टपणे उत्तर दिले.
‘तू पुढच्या वर्षी लग्न करतेस’, अशी चर्चा रंगली आहे. त्यावर प्राजक्ताने अरे “हे दरवर्षी म्हटलं जातं. २०१८ पासून हे सर्व सुरु आहे. यावर्षी नाही नाही पुढच्या वर्षी असं सर्व सुरु आहे. हे सुरुच आहे. पण अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मी लग्न करु नये.”
आणखी वाचा : “माझं लग्न रखडतंय कारण…” प्राजक्ता माळीने सांगितलं लग्न न करण्याचे कारण
“काहींना वाटतंय मी लग्न करावं, काहींना वाटतंय मी करु नये. त्यांच्यामुळे माझं लग्न रखडतंय. त्या मुलांमुळे माझं लग्न रखडतंय. त्या मुलांची अशी इच्छा आहे की मला हिला भेटायचं, त्याशिवाय हिचं लग्न झालं नाही पाहिजे. त्यामुळे माझ लग्न रखडलंय.” असे प्राजक्ता माळी म्हणाली.
आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट
प्राजक्ता माळीचे हे उत्तर ऐकून तिची मैत्रीण आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने ‘तुला कुठे महाराष्ट्रीयन मुलगा हवाय, तुला कोण हवाय ते सांग ना’, असे म्हटले. त्यावर प्राजक्ताने “माझं अनेक दाक्षिणात्य सुपरस्टार जे आहेत, त्यांच्यावर जास्त क्रश आहे. पण कोणीही असलं ना, तरी शेवटी आपण त्याला मराठीच बनवायचं”, असे सांगितले.
दरम्यान प्राजक्ताच्या या वक्तव्यानंतर तिला अमराठी मुलाशी लग्न करायचं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण तिने या मुलाखतीत कुठेही असं स्पष्ट केलेले नाही. प्राजक्ता माळीने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मी लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले होते.