मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. अनेक चित्रपट, मालिका, वेबसीरिज या मनोरंजनाच्या विविध माध्यमांत हटके भूमिका साकारत तेजस्विनीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या या भूमिकांचे प्रचंड कौतुकही झाले. तेजस्विनीने आता निर्माती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘अथांग’ या गाजत असलेल्या मराठी वेबसीरिजच्या माध्यमातून सध्या ती चर्चेत आहे. या निमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजस्विनीने अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित या दोघीही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघींनी तू ही रे या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. या चित्रपटातील दोघींचेही पात्र चांगलेच चर्चेत राहिले. तेजस्विनीची ‘अथांग’ ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली. याच्या निर्मितीची जबाबदारी तेजस्विनीने घेतली आहे. ती यात कोणत्याही भूमिकेत दिसत नसली तरी या वेबसीरिजसाठी तिने पडद्यामागे अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
आणखी वाचा : “नागराज मंजुळे आकाशला…” मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली
नुकतंच एका मुलाखतीत तिला सई ताम्हणकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने “दुनियादारी’ या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरने शिरीन ही भूमिका साकारली होती. मात्र ही भूमिका मला ऑफर करण्यात आली होती”, असा मोठा गौप्यस्फोट तेजस्विनी पंडितने यावेळी केला. याबरोबरच तिने सईबद्दलही भाष्य केले.
“सई ताम्हणकर आणि मी अनेकदा एकमेकांशी बोलतो. त्यावेळी तिला मी हे अनेकदा सुनवते की सई एकतर तुझ्या भूमिका माझ्याकडे येतात किंवा मग माझ्या भूमिका तुझ्याकडे जातात. अनेकदा तर माझ्याच भूमिका तुझ्याकडे गेल्या आहेत, पण त्याला काही करु शकत नाही. पण काहीही असलं तरीही सई मला एक मुलगी म्हणून आवडतेच. ते तिलाही माहितीच आहे”, असे तेजस्विनी पंडित म्हणाली.
आणखी वाचा : “शिरीन ही भूमिका माझी होती, पण सई ताम्हणकरने…” तेजस्विनी पंडितचा ‘दुनियादारी’बद्दल मोठा गौप्यस्फोट
दरम्यान तेजस्विनी पंडितने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. नुकतंच तेजस्विनीने ‘अथांग’ वेबसीरिजची निर्मिती केली आहे. यात तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. यात संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.