मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि अभिनेता आदिनाथ कोठारे हे कायमच चर्चेत असतात. मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय कपलपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. ‘परफेक्ट फॅमिली’ आणि ‘परफेक्ट कपल’असलेल्या या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र त्यांच्या सर्व काही नीट सुरु आहे. नुकतंच उर्मिलाने प्रेमात धोका मिळाल्यानंतर काय करशील? याबद्दल भाष्य केले.
उर्मिला कोठारे हिने नुकतंच प्लॅनेट मराठीवरील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात तिला तिच्या खासगी आयुष्याबरोबर चित्रपटाबद्दलचे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने मनमोकळेपणाने उत्तर दिली. यावेळी उर्मिलाला ‘प्रेम म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला होता.
आणखी वाचा : उर्मिला कोठारे लवकरच घेणार समीर वानखेडेंची भेट, कारण…
त्यावर ती म्हणाली, “प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास.” यावर लगेचच याच प्रेमाने जखम दिली तर, असे उर्मिलाला विचारण्यात आले. त्यावर तिने “तर मग काय, दुसरं प्रेम शोधायचं”, असे उर्मिला कोठारे म्हणाली. तिचे हे उत्तर ऐकून अभिनेत्री क्रांती रेडकरसह सर्वजण जोरजोरात हसायला लागले.
आणखी वाचा : उर्मिलासोबत बिनसलेल्या नात्यावर आदिनाथ कोठारेने सोडले मौन, म्हणाला “आमच्या दोघात…”
दरम्यान उर्मिला कोठारे लवकरच सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘कंपास’ (Compass) या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये उर्मिला कोठारे ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ही वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरीजमध्ये उर्मिला कानेटकर – कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, खुशबू तावडे, सुयश टिळक, संग्राम साळवी, सौरभ गोखले, धवल पोकळे, राजेंद्र शिसतकर, गिरीश जोशी, आनंद इंगळे, संजय मोने हे कलाकार झळकणार आहे. या वेबसीरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर आणि संतोष रत्नाकर गुजराथी हे करत आहेत.