Yek Number OTT Release : ‘येक नंबर’ हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. थिएटर रिलीजला एक महिना होण्याआधीच हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. तसेच हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, त्याची माहितीदेखील समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजेश मापुस्कर दिग्दर्शित प्रेम व राजकीय महत्त्वाकांक्षेचे कथानक असलेल्या ‘येक नंबर’ चित्रपटात धैर्य घोलप व सायली पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तेजस्विनी पंडित व वरदा नाडियादवाला यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होतोय. ‘येक नंबर’ हा चित्रपट प्रेक्षकांना ८ नोव्हेंबरपासून झी 5 वर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ व्या मजल्यावर आहे फ्लॅट

झी 5चे चीफ बिझनेस ऑफिसर मनिष कालरा म्हणाले, “आमच्या मराठी पोर्टफोलिओमध्ये ‘‘येक नंबर’’ या चित्रपटाची भर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. प्रेम व राजकीय नाट्य यांची या चित्रपटात उत्तम प्रकारे सांगड घातली आहे. ‘धर्मवीर २’ या चित्रपटानंतर आमच्या मराठी कंटेन्टमध्ये ही उत्तम कलाकृती समाविष्ट झाली आहे.”

येक नंबर ओटीटी रिलीज अपडेट (फोटो – पीआर)

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणाले, “‘येक नंबर’ हा माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक प्रवास होता. या चित्रपटात प्रेम आणि राजकीय महत्त्वाकांक्षा या दोन भावना गुंफल्या आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता झी 5 च्या माध्यमातून हा चित्रपट अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याचा मला अत्यंत आनंद आहे. या प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना घरी बसून आमच्या चित्रपटाचा आनंद घेता येईल. ‘येक नंबर’च्या डिजिटल प्रदर्शनासाठी मी अत्यंत उत्सुक आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यातील प्रेम व विचारधारा यावर अर्थपूर्ण चर्चा घडेल.”

‘येक नंबर’ चित्रपटाची निर्माती तेजस्विनी पंडित म्हणाली, “आम्हाला ही प्रभावी कथा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झी 5 बरोबर भागीदारी केल्याचा आनंद आहे. ‘येक नंबर’मध्ये लाखो प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याची क्षमता आहे. उत्तम कलाकार आणि राजेश मापुस्कर या दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकासह काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.”

हेही वाचा – “जेव्हा मी कुठल्याही गणपतीकडे बघतो; त्याचा हात…”, काय म्हणाला प्रसाद ओक?

‘येक नंबर’ चित्रपटात प्रतापची भूमिका साकारणारा धैर्य घोलप म्हणाला, “प्रताप ही व्यक्तिरेखा साकरण्याचा अनुभव खूप चांगला होता. प्रेक्षकांकडून या व्यक्तिरेखेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने मी अत्यंत रोमांचित झालो आहे. प्रेम आणि महत्त्वाकांक्षेने प्रेरित असलेला प्रतापचा प्रवास आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झगडणाऱ्या अनेकांचा संघर्ष अधोरेखित करतो.”

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie yek number ott release tejaswini pandit raj thackeray sayli patil hrc