‘बिग बॉस ओटीटी’चं दुसरं पर्व चांगलंच चर्चेत आहे. याची लोकप्रियता वाढल्यामुळे हे पर्व दोन आठवड्यासाठी वाढवण्यात आल्याची घोषणा मागील वीकेंडला होस्ट सलमान खाननं केली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात नव्या सदस्यांची एंट्री पाहायला मिळाली. आशिका भाटिया आणि एल्विश यादव हे या घरातील नवे सदस्य असून आता आणखी एका सदस्याच्या एंट्रीचा व्हिडीओ समोर आला आहे. बिग ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात मराठमोळा व्हिडीओ क्रिएटर दीपराज जाधवनं एंट्री केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपराज जाधवच्या एंट्रीचा व्हिडीओ जिओ सिनेमाच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दीपराज ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात एंट्री करताना दिसतं आहे. त्याचवेळी घरातील सदस्यांना नव्या सदस्याला कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा टास्क देण्यात आला आहे. त्यामुळे, जेव्हा दीपराज घरातील सदस्यांबरोबर संवाद साधायला जातो, तेव्हा त्याला कोणीही प्रतिसाद देत नाही.

हेही वाचा – “उंदीर, किडे असलेली डाळ खायचो”; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्यानं सांगितला तुरुंगातला भयाण अनुभव, म्हणाला…

दीपराज हा मराठमोळा व्हिडीओ क्रिएटर असून त्याचे इन्स्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स आहेत; तर युट्यूबवर दीपराजचे दोन लाख ७७ हजार सबस्क्रायबर्स आहेत.

हेही वाचा – “तुमच्याबरोबर काम करणं अभिमानास्पद”, शाहरुख खान दाक्षिणात्य सुपरस्टारच्या प्रेमात

हेही वाचा – फोटोग्राफरची रस्त्यावर पडलेली चप्पल उचलली अन्… आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘बिग बॉस’ ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात आणखी चार जणांचा प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये आरजे मलिश्का, मालिनी अग्रवाल, बीसी आंटी म्हणजे स्नेहल मेहरा आणि डॅनी पंडित यांचा समावेश आहे. त्यामुळे आता येत्या भागात यापैकी कोण-कोण घरात एंट्री करणार हे समजेल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi video creator dipraj jadhav entry in bigg boss ott season 2 pps