मराठीमधील बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. तिने अभिनयातदेखील सरस आहोत हे दाखवून दिले आहे. सईने फक्त मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिमध्ये अडकून न राहता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आहे. हंटर या चित्रपटातून तिने पहिल्यांदा हिंदीत काम केले आहे. त्यानंतर क्रिती सॅनॉनबरोबर मिमी चित्रपटात झळकली होती. आता तिचा नवा हिंदी चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे.

सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून फोटो शेअर करत ही माहिती दिली. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाउन’ या बहुचर्चित चित्रपटाचे पोस्टर तिने पोस्ट केले आहे. या पोस्टरमध्ये ती कोणत्यागी ग्लॅमर अवतारात नस दिसता साध्य अवतारात दिसत आहे. तिच्याबरोबरीने पोस्टरमध्ये प्रतीक बब्बर, प्रकाश बेलवडी, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमराहे कलाकार दिसत आहेत. सगळे एका कुलुपात अडकले आहेत असे दाखवण्यात आले आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Ranveer Singh not allowed to walk into my office and say he wants to be Shaktimaan
रणवीर सिंहला ऑफिसमध्ये ३ तास वाट का पाहायला लावली? मुकेश खन्ना म्हणाले, “मी त्याला थांबायला भाग…”
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
KL Rahul Statement on Lucknow Super Giants Exit Reveals Reason Ahead of IPL 2025 Auction Said I wanted Freedom
KL Rahul: “मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशा संघात…”, केएल राहुलचे लखनौने रिलीज केल्यानंतर मोठं वक्तव्य, संघ सोडण्यामागचं सांगितलं कारण
amol kolhe bag checked after uddhav thackeray
उद्धव ठाकरेंनंतर महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याच्या बॅगची तपासणी, नेमकं काय घडलं?

श्रीदेवींच्या चित्रपटांच्या रिमेकवर जान्हवी कपूर म्हणाली,”तिचे चित्रपट….”

चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट नेमका कशावर आधारित असणार आहे हे प्रेक्षकांना समजले आहे. २०२० साली भारतात करोना महामारीमुळे लागलेल्या ताळेबंदीवर हा चित्रपट आधिरीत असणार आहे. विषयांवर भाष्य करणारे दिग्दर्शक म्हणजे मधुर भांडारकर त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी त्यांनी चांदनी बार, फॅशन, पेज ३ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाची निर्मिती पीईएन स्टुडिओज, मधुर भांडारकरचे भांडारकर एंटरटेनमेंट आणि प्रणव जैन यांच्या पीजे मोशन पिक्चर्सचे डॉ. जयंतीलाल गडा यांनी केली आहे. मधुर भांडारकरबरोबर अमित जोशी आणि आराधना साह यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. या चित्रपटाचा प्रीमियर २ डिसेंबर रोजी झी ५ या ओटीटी प्लँटफॉर्मवर होणार आहे.