Mirzapur Season 3 : मिर्झापूरचा ( Mirzapur ) सिझन ३ मागच्याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिझनमध्ये १० एपिसोड होते. सिझनच्या सुरुवातीलाच ‘मुन्ना त्रिपाठी’च्या (दिव्येंदू शर्मा) मृतदेहावर त्याची पत्नी माधुरी अंत्यसंस्कार करते असं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे हा सिझन अनेकांना आवडला नाही. अनेकांनी रिलिजच्या दिवशीच मिर्झापूर ( Mirzapur ) सिझन थ्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. खरंतर बुद्धिबळाचा खेळ, शह-काटशाह यांचं राजकारण आणि गुड्डू तसंच शरद यांच्यातला संघर्ष पाहण्यास मजा आली. हा सिझन खूप डोकं लावून बनवण्यात आला आहे. शेवटच्या २० मिनिटांतला ट्विस्टही आवडला. तरीही मुन्ना नसल्याने सिझन कुछ जमाँ नही असं अनेकांना वाटलं. मात्र हाच मुन्ना त्रिपाठी कमबॅक करु शकतो अशी चिन्हं आहेत. कारण आहे मिर्झापूरच्या बोनस एपिसोडचा प्रोमो.

मिर्झापूरमध्ये कलाकारांची फौज

मिर्झापूरमध्ये ( Mirzapur ) पंकज त्रिपाठी (कालीन भय्या), अली फैजल (गुड्डू पंडित), श्वेता त्रिपाठी (गोलू), रसिका दुग्गल (बीना त्रिपाठी), विजय वर्मा (भरत त्यागी), इशा तलवार (माधुरी यादव) अशी कलाकारांची फौज आहे. सिझन थ्रीमध्ये रक्तपात, शिवीगाळ हे सगळं तर आहेच. शिवाय बुद्धिबळातील डावाप्रमाणे शह आणि काटशह यांची फोडणीही दिली आहे. रंगतदार आणि तितकाच मसालेदार असा हा सिझन झाला आहे. तरीही अनेक प्रेक्षकांना हा आवडला नाही कारण यात मुन्ना त्रिपाठी नाही.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
ncp leader ajit pawar launch connect with people initiative
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता संवाद उपक्रम; आठवड्यातील तीन दिवस मंत्री पक्षाच्या मुख्यालयात
baby john ott release
Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या

हे पण वाचा- Mirzapur Season 3 Review: बुद्धिबळ, रक्तरंजित डावपेच आणि सिंहासनाच्या वर्चस्वाची रंजक कहाणी

मुन्ना त्रिपाठीचं काय झालं आहे?

Mirzapur चा सिझन २ संपतानाच गुड्डू पंडीतने मुन्ना त्रिपाठीला ठार केलं आहे. गोलू आणि गुड्डू मुन्ना जिथे असतो तिथे पोहचतात. त्यानंतर कालीन भय्यावरही गोळ्या झाडतात. मात्र कालीन भय्याला शरद तिथून कसाबसा घेऊन निसटतो. आता तिसऱ्या सिझनमध्ये मुन्नाच्या मृतदेहावर माधुरी अंत्यसंस्कार करतानाच दाखवली आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. खरंतर दिव्येंदू शर्मा हा मुन्ना त्रिपाठी हे पात्र जगला आहे. कारण दुसऱ्या कुणाला अशी भूमिका करता आली नसती. प्रसंगी विनोदी, प्रसंगी प्रचंड क्रूर, प्रचंड हपापलेला असा मुन्ना त्रिपाठी दिव्येंदूने लीलया रंगलवला आहे. तिसऱ्या सिझनमध्ये त्याची झलकही नाही. मात्र नव्या प्रोमोने प्रेक्षकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

Mirzapur Season 3
मिर्झापूरच्या सिझन थ्रीचा बोनस एपिसोड येणार, मुन्ना त्रिपाठी करणार कमबॅक?

काय आहे प्रोमोमध्ये?

बोनस एपिसोडच्या प्रोमोत गुड्डू अर्थात अली फजल खास त्याच्या संवाद शैलीत सांगतो आत्ता प्राईम व्हिडीओजच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथून डिलिट केलेल्या सीनचा गुंता सोडवून आलो आहे. “नजर रखना बोनस एपिसोडपर. देखोगे तो भौकाल मच जाएगा, और एक बहुतही चर्चित लौंडाभी है.. हम ही उसे मौत के घाट उतारे थे, अर्थात डिलिट मारे थे. बहुत जलवा है साले का. वापस आना चाह रहा है. देखिये मिर्झापूर ३ का बोनस एपिसोड आ रहा है इस महिने.” असं गुड्डू त्याच्या खास अंदाजात सांगतो.

गुड्डू आणि गोलूने या सिझन टूमध्ये मुन्नाला संपवलं आहे. आता तो परत येणार असेल तर तिसऱ्या सिझनच्या बोनस एपिसोडमध्ये काय असणार? हा एपिसोड किती वेळाचा असणार? मुन्नाचं कमबॅक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थात या प्रश्नांची उत्तरं सिझन ३ चा नवा एपिसोड आल्यावरच कळू शकणार आहेत.

Story img Loader