Mirzapur Season 3 Review Rating: अमेझॉन प्राइम व्हिडीओवरील लोकप्रिय व बहुप्रतिक्षीत वेब सीरिज ‘मिर्झापूर’ चा तिसरा सीझन आज शुक्रवारी (५ जुलै) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दुसऱ्या सीझननंतर तब्बल चार वर्षांनी या गाजलेल्या सीरिजचा चौथा भाग येणार अशी घोषणा निर्मात्यांनी केल्यापासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून सीरिज रिलीज झाली आहे. या नवीन सीझनमध्ये कालीन भैया आणि गुड्डू पंडित यांच्यात सत्तेसाठीचे डावपेच पाहायला मिळत आहेत. या सीझनबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, ते जाणून घेऊयात.

Live Updates

वाचा 'मिर्झापूर ३'बद्दल प्रत्येक अपडेट्स

15:15 (IST) 5 Jul 2024
पंकज त्रिपाठींचा अभिनय दमदार, तिसरा सीझन आवडला नाही, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

https://twitter.com/ManviTaneja7/status/1809046308688109814

14:43 (IST) 5 Jul 2024
मिर्झापूरच्या कालीन भैयाचा डायलॉग चर्चेत

"जिस शहर में तुम नौकर बन कर आए हो, मालिक है हम शहर के..." असं म्हणतानाचा कालीन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

https://twitter.com/imu07280300033/status/1809152125403869397

13:55 (IST) 5 Jul 2024
मुन्ना भैय्याशिवाय मिर्झापूर, मिर्झापूर नाही

"मुन्ना भैया शिवाय मिर्झापूर मिर्झापूर नाही. पण पंकज त्रिपाठी सर्वोत्तम अभिनेते आहेत," अशी पोस्ट एका चाहत्याने केली आहे.

https://twitter.com/bagwan_kamran/status/1809135800832893398

12:59 (IST) 5 Jul 2024
'पंचायत'च्या सचिव जींची मिर्झापूरमध्ये एंट्री

'पंचायत'च्या सचिव जींची एंट्री 'मिर्झापूर ३' मध्ये झाली. अली फजलने खुलासा केला होता की कालीन भैय्याच्या मृत्यूशी संबंधित काही पेपर वर्कसाठी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत जितेंद्र कुमार दिसणार आहे. त्यानुसार, चाहते या सीरिजमध्ये जितेंद्र कुमारला पाहून खूपच आनंदी आहेत.

12:20 (IST) 5 Jul 2024
मुन्ना भैय्याच्या चाहत्यांची नाराजी

मिर्झापूर सीरिज मुन्ना भैय्याशिवाय मनोरंजक नाही, अशा पोस्ट चाहते सोशल मीडियावर करत आहेत.

https://twitter.com/Imanishsingh15/status/1809110484357976247

12:01 (IST) 5 Jul 2024
मिर्झापूर ३ ऑनलाइन झाली लीक

मिर्झापूर ३ सीरिज ऑनलाइन लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. लोक एचडीमध्ये सर्व एपिसोड डाउनलोड करून पाहत आहेत. मिर्झापूर ३ मध्ये १० एपिसोड्स आहेत आणि प्रत्येक एपिसोड ४५ मिनिटांचा आहे.

11:30 (IST) 5 Jul 2024
प्रेक्षकांना मुन्ना भैय्याची आली आठवण

'मिर्झापूर ३' मध्ये मुन्ना भैयाचे पात्र दाखवण्यात आलेले नाही. आधीच्या दोन सीझनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मुन्ना भैयाची प्रेक्षकांना या सीझनमध्ये आठवण आली आहे.

https://twitter.com/SanjuGoyel/status/1809102242315718965

11:25 (IST) 5 Jul 2024
अली फझलची चाहती आहे रिचा चड्ढा

रिचा चड्ढाने पती अली फजलच्या दमदार अभिनयाचं कौतुक करत त्याची चाहती असल्याचं म्हटलं आहे.

11:18 (IST) 5 Jul 2024
"सावधान रहना चाहिए", 'मिर्झापूर ३' चा व्हिडीओ चर्चेत

प्राइम व्हिडीओने इन्स्टाग्रामवर मिर्झापूर ३ चा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/C9Bx7t7I_UJ/?utm_source=ig_web_copy_link

10:47 (IST) 5 Jul 2024
'मिर्झापूर ३' बद्दल प्रेक्षक म्हणतात...

ही बहुप्रतिक्षीत सीरिज पाहिल्यावर प्रेक्षक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.

https://twitter.com/Abhishekgiri220/status/1809076272892428544

 
 

Mirzapur 3

 

Mirzapur Season 3 Review Rating on OTT Live: 'मिर्झापूर ३' सीरिज कशी आहे? वाचा लोकांचे रिव्ह्यू